spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानाच्या अडचणी तातडीने दूर करा

– गलिच्छ वस्ती निर्मूलन व घर बांधणी विशेष समिती सभापती रूतिका मसराम यांचे निर्देश

नागपूर :- घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानातील अडचणी तातडीने दूर करण्यात यावे असे निर्देश गलिच्छ वस्ती निर्मूलन व घर बांधणी विशेष समिती सभापती रूतिका मसराम यांनी दिले. नागपूर महानगरपालिकेत गलिच्छ वस्ती निर्मूलन व घर बांधणी विशेष समितीची बैठक समिती सभापती रूतिका मसराम यांच्या अध्यक्षतेत डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती, स्थायी समिती सभागृह येथे पार पडली.

बैठकीत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना २.० आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या रमाई घरकुल योजनेच्या संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच योजनेच्या माध्यमातून झालेल्या कार्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी रमाई घरकुल योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानात लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणींना दूर करण्यासाठी चर्चा करण्यात आली. बैठकीत सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, समिती सदस्य नागेश मानकर, विवेक निकोसे, योगिता तेलंग, कार्यकारी अभियंता अश्विनी येलचेटवार तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत राज्य शासनाच्या रमाई घरकुल योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मिळणाऱ्या तीन टप्प्यातील अनुदानासंदर्भात अडचणीं संबंधित चर्चा करण्यात आली. निवडक लाभार्थ्यांना आलेल्या अडचणींना तातडीने दूर करण्यात यावे आणि यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत लाभार्थ्यांना सहयोग करावा असे निर्देश सभापती मसराम यांनी दिले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.