spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वरिष्ठ नागरिक सोनेगांव मंडळातर्फे स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा

नागपूर :- वरिष्ठ नागरिक मंडळ, सोनेगाव नागपूरच्या वतीने सोनेगाव तलाव परिसरात भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष ब्रिजेश खापेकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहुणे नगरसेवक ईश्वर ढेंगळे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. ९२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक नानासाहेब बारहाते यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी परिसरात देशभक्तीचा उत्साहपूर्ण माहोल निर्माण झाला होता. कार्यक्रमात श्रीधर मानकर, पारेख आणि नखाते यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. प्रमुख पाहुणे ईश्वर ढेंगळे यांनी मार्गदर्शन करतांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांच्या कार्याला उजाळा दिला. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या अनुभवातून तरुण पिढीला मार्गदर्शन करून देशाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन श्रीधर मानकर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष ब्रिजेश खापेकर, कार्याध्यक्ष मारोती इंगोले, उपाध्यक्ष सुनील माटे, सचिव मदन फटिंग, कोषाध्यक्ष चंद्रशेखर काकडे यांच्यासह हिरालाल पराते, देविदास पिलारे, कृष्णा साटोने, अनंत पेटकर, संजय पौनीकर, रामकृष्ण पिंपळीकर, सुनील पारेख, रामभाऊ झोड, वसंत झुनके, अरुण सालवणकर, नीलकंठ ठाकरे, मौंदेकर, खोत, गुप्ता, अनिल मूर्ती, बोरीकर, हिंगणकर आणि विष्णू उंबरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना परस्परांशी स्नेह, संवाद व आनंदाचे क्षण अनुभवता आले. अशा सामाजिक व देशभक्तीपर उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना मिठाई व अल्पोपाहाराचे वाटप करण्यात आले.

Popular Articles