किशोर साहू, मौदा :- दरवर्षीप्रमाणे यंदाही गट ग्रामपंचायत आष्टी (नवेगाव) व पोस्ट चाचेर अंतर्गत येत असलेल्या आष्टी येथे श्री बापूजी बोवा मंदिर येथे रविवार (ता.16 ऑगस्ट) पासून नागपंचमी महोत्सवाला सुरुवात झाली असून विविध धार्मिक व भक्तीमय कार्यक्रम सुरू आहेत. उद्या सोमवार (ता. 17 ऑगस्ट)ला सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण आष्टी गावातून भव्य नगरफेरी, भजन कार्यक्रमानंतर श्री बापूजी बुवा यांची महाआरती, त्यानंतर महाप्रसादाचे वितरण होणार आहे. तरी या कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आव्हान आयोजक समस्त आष्टी ग्रामवासी यांनी केले आहे.








