spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महाराष्ट्र शेतजमीन अधिनियमात महत्त्वपूर्ण बदल

– आता सिलिंगच्या जमिनीही भोगवटदार एक मध्ये रूपांतर करणे सुलभ

– महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

नागपूर :- महाराष्ट्र शेत जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम अंतर्गत वाटप झालेल्या सिलिंग जमीन संदर्भात भोगवटादार वर्ग दोन जमिनीचे वर्ग एक मध्ये रूपांतरण करणे सुलभ झाले आहे. यासंदर्भातील शासन अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

सीलिंग कायद्याअंतर्गत वाटप जमिनी भोगवटादार एक मध्ये रूपांतरीत करण्यासाठी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती व त्यासंदर्भात हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961 अंतर्गत वाटप झालेल्या (Ceiling) भोगवटादार वर्ग-2 जमिनींचे भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतरण नियम, 2026 प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या निर्णयाचा लाभ सिलिंग संबंधित असलेल्या जमिन धारकांना होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 4 मे रोजी च्या राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. भोगवटादार वर्ग दोन चे भोगवटादार वर्ग एक रूपांतरण नियम 2026 हे नियम केवळ सिलिंग अंतर्गत वाटप झालेल्या जमिनीसाठीच लागू आहेत. सिलिंग अंतर्गत भोगवटादार वर्ग एक रूपांतरण करीता जमीन वाटप झाल्यानंतर किमान दहा वर्षे पूर्ण झाली असावी. वाटपाच्या अटी व शर्तीचे उल्लंघन नसणे आवश्यक आहे. जर शर्तीचे उल्लंघन झाले असल्यास प्रथम ते नियमाधीन करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक असून या प्रस्तावासोबत संपूर्ण दस्तऐवज जोडणे आवश्यक आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर तीन महिन्याच्या पडताळणी तसेच जमीन वाटपाच्या अटी वापर व उल्लंघन याची तपासणी करण्यात येईल. संपूर्ण पडताळणी झाल्यानंतर अंतिम आदेश पंधरा दिवसाच्या आत करण्यात येईल. रूपांतरण अधिमुल्य रेडीरेकनर वार्षिक दर विवरणपत्र नुसार बाजार मूल्यावर आधारित राहील.

भोगवटादार वर्ग 1 रूपांतरणाबाबत पन्नास लाखापर्यंत बाजार मूल्य असलेल्या प्रकरणात जिल्हा स्तरावर निर्णय घेण्यात येईल तसेच 50 लाखापेक्षा जास्त बाजार मूल्य असल्यास यासाठी राज्य शासनाची पूर्व मान्यता आवश्यक राहील. अधिमूल्य भरण्यासंबंधी नोटीस दिल्यानंतर तीन महिन्याच्या आत भरणा करणे अनिवार्य आहे मुदतीत भरणा न केल्यास प्रकरण रद्द होऊ शकते.

बेकायदेशीर हस्तांतरण अथवा अटीचे उल्लंघन असल्यास प्रथम नियमाधीन करणे आवश्यक आहे पूर्वपरवानगीशिवाय झालेल्या बदलाची स्वतंत्र तपासणी करण्यात येणार आहे. यासंदर्भात ज्या क्षेत्रात जमीन स्थित आहे ती क्षेत्र व रूपांतर अधिमुल्य शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.

रूपांतरणानंतर जमीन भोगवटादार वर्ग एक सिलिंग मुक्त स्वरूपात नोंदवली जाईल. या निर्णयामुळे जमिनीवरील निर्बंध कमी होऊन व्यवहार सुलभ होतील तसेच जमीन महसुलात वाढ होईल.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.