spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गोंदियात शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते स्वयंपाकीताई,आदर्श सरपंच तसेच आदर्श शिक्षकांचा करण्यात आला सत्कार

गोंदिया :- जिल्ह्यात शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने पहिल्यांदाच शिक्षक-शिक्षण अधिसंमेलन आयोजित करण्यात आला असून या अधिसंमेलनात शिक्षण क्षेत्रातील आदर्श शिक्षक,ग्रामविकासात योगदान देणारे आदर्श सरपंच आणि विद्यार्थ्यांच्या शालेय पोषणात योगदान देणाऱ्या स्वयंपाकी ताईंचा आज शिक्षण राज्य मंत्री पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर ,उपाध्यक्ष सुरेश हर्षे आमदार विनोद अग्रवाल ,राजकुमार बडोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या अधिवेशनात शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शाळेत शिकवताना शिक्षकांना इत्तर कुठलीही कामे देऊ नये, वयोवृद्ध शिक्षकांना टीईटी परीक्षेची लावण्यात आलेली अट शिथिल करण्यात यावी तसेच शिक्षकांना जिल्हा मुख्यालयी राहण्याची अट रद्द करण्यात यावी सोबतच जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या शह अनेक मागण्या या वेळी शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने मंत्री मोहद्यान समोर ठेवण्यात आल्या असून येत्या काळात शिक्षकांवर शिक्षणा व्यतिरिक्त लादण्यात येणारी कामे काढण्यात येतील अशी ग्वाही या वेळी शिक्षण राज्य मंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे.

तर शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक-शिक्षण अधिसंमेलनातं गोंदिया जिल्यातील हजारो शिक्षकांनी हजेरी लावली होती सोबतच स्वयंपाकी ताई आणि आदर्श सरपंच देखील मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Popular Articles