कामठी :- केंद्र सरकारच्या मनमानी हुकूमशाही पद्धतीमुळे महागाईत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे ,बेरोजगारी वाढली आहे ज्यामुळे येथील जनता हवालदिल झाली आहे मात्र धर्मांध आंधळे झालेल्याना या सर्व महागाईचा फटका बसून ही मौन बाळगून आहेत मात्र येथील शिक्षित तरुणाई स्वतःच्या भविष्याचे नुकसान डोळ्यासमोर बघत असताना येथील जागरुक नागरिक व शिक्षित बेरोजगार तरुणवर्ग केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत. त्यातच आता कॉकरोच नावाच्या पक्षाचे उगम झाले आहे. या उगमस्थानाकडे दिवसेंदिवस तरुण पिढी या पक्षाच्या सोबत अकाऊंटल जुडत आहेत.येथील तरुणाई व जनता आता जागी झाली आहे.भाजप ची विचारधारा सहन होत नसल्याने व येथील आंबेडकरी संघटना प्रबळ नसल्याने नाईलाजास्तव कांग्रेसच्या दावणीला बांधत असले तरी गटातटात विखुरलेल्या कांग्रेस कडूनही येथील जागरूक व शिक्षित बेरोजगार तरुणाईचे अपेक्षाभंग होत आहेत .एखाद्या न्यायिक मागण्याची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाला निवेदन देऊन कर्तव्य बजावल्याचे धन्यता मानतात .मात्र येथील जागरूक नागरिक पर्यायी न्यायापासून अजूनही अपेक्षित आहेत.मात्र आता नव्याने उगम झालेल्या कॉकरोच जनता पार्टीमुळे देशात नवीन क्रांती घडून येईल अशी आशा कामठी तालुक्यातील तरुणाई व जागरूक नागरीक बाळगून आहेत. देशाची संपत्ती मूठभर लोकांच्या हातात एकवटली आहे.तर कोट्यवधी जनता अजूनही दारिद्र्यात दिवस काढत आहेत.लोकशाही मार्गाने निवडून येणारे राजकारण पूर्ण भ्रष्ट झाले आहे.सज्जन प्रामाणिक समाजसेवकांची संख्या बोटावर मोजण्याइतकी उरली आहे.उडदामध्ये कारे गोरे निवडावे अशी नामुष्की झाली आहे.शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजांकडे व्यवस्थेचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.सरकारी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.देशाचा कणा असलेल्या शेतकर्यांचीबीपीळवणूक थांबायचे नाव घेत नाही .शेतकऱ्याच्या घामाला किंमत नाही ,नोकरी, शिक्षण मोठ्या पदावर जाण्यासाठी आज प्रामाणिकपणा आणि गुणवत्ता नाही तर पैसा ओळख आणी वशिलेबाजी लागते.सत्तेतील पुढारी जाती धर्माच्या नावावर समाजात दुफळी माजवत आहेत.सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे प्रश्न ऐकायला कोणी तयार नाही त्यांना सतत हिनवले जात आहे.प्रत्येक ठिकाणी शांततेचा मार्ग मानला जातो पण ईव्हीएमद्वारे कटकारस्थान करून निवडणूक आयोग ताब्यात घेतला आहे अशी भावना तरुण वर्गात वाढत आहे.निवडणुका निष्पक्ष व्हायला हव्यात यावर जनतेचा विश्वास बसला पाहिजे .आज राज्यकर्ते सतत मानसिक , आर्थिक, सामाजिक व राजकीय तणाव निर्माण करीत आहेत. सुशिक्षित तरुणांना न्याय मिळत नाही त्यामुळे आता तरुणाई व जागरुक नागरिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी पर्यायाने कॉक्रोच जनता पार्टी चे स्वागत करीत आहे .व कामठी तालुक्यात कॉक्रोच जनता पार्टी नव्या क्रांतीची हाक ठरत आहे.
कामठी तालुक्यात कॉकरोच जनता पार्टीमुळे तरुणाईत संचारली नव्या क्रांतीची हाक!

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.


