spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात, रोग निदान शिबिराचे आयोजन, शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

खापा,वार्ताहर :- युवा मित्रपरिवार खापातर्फे परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन बाजार चौक येथे स्थित विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे (दि. १४ मे) गुरुवार रोजी करण्यात आले होते. शिबिराचा शंभरहून अधिक ग्रामस्थांनी लाभ घेतला. छत्रपती संभाजी महाराज‎ यांच्या जयंती निमित्त शिबिर आयोजित करण्यात‎ आले होते.

शिबिराचे‎ उद्घाटन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून, नगरसेवक नामदेव गजभिये, नगरसेवक आशिष ढाले, मनोज धानोरे, डॉ. कोमल चोपकर यांच्या हस्ते‎ करण्यात आले‎.

मिडास हॉस्पिटल नागपूरचे तज्ञ डॉ. कोमल चोपकर, डॉ. कुणाल ताकसांडे, डॉ. मयुर महाजन, डॉ. स्नेहा राऊत, ऑप्थॅल्मोलॉजिस्ट डॉ. हर्षद जाधव आणि चमू यांनी रुग्णांची तपासणी केली. सामान्य आरोग्य तपासणी, बी. पी., शुगर, इ. सी. जी., डोळ्यांची तपासणी आदी रोगांचे निदान करण्यात आले.

यावेळी अंकित मुंगोले, मोनू ठाकूर, अक्षय हिंगे, संदीप गिरपुंजे तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते मुकेश पावडे यांनी खापा सारख्या मागासलेल्या शहरात रुग्णांसाठी आरोग्य शिबिर भरून चांगला उपक्रम राबवला आहे. असे उपक्रम ग्रामीण भागात राबवण्याची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते मकसूद शेख यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक मनीष मारोतकर यांनी केले. आभार मुकेश पावडे यांनी मानले. शिबिर यशस्वी‎ करण्यासाठी प्रज्वल नंदनवार, गोलू बारापात्रे, स्नेहल सुपारे, गोलू नंदनवार, चरण गजभिये, सचिन भैसारे, आकाश प्रजापती यांच्यासह शहरातील नागरिक व युवा मित्रपरिवारच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.‎


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.