Home Latest News शेती, मका, ज्वारी उत्पादकांचा समावेश; महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्याला यश

शेती, मका, ज्वारी उत्पादकांचा समावेश; महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्याला यश

0
33

– शेतकऱ्यांसाठी 132.93 कोटींचा निधी मंजूर

नागपूर :- महाराष्ट्रातील मका आणि ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत देयकांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते भूषण कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या आक्रमक पाठपुराव्यामुळे शासनाने १३२.९३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

खरीप पण २०२४-२५ अंतर्गत मका आणि ज्वारीची विक्री केलेल्या ४७,००० हुन अधिक नोंदणीकृत शेतकऱ्यांचे थकीत पैसे प्रलंबित होते. या गंभीर प्रश्नावर भूषण कुंटे यांनी २३ जानेवारी रोजी ई-मेलद्वारे मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता. आम्ही मिळवले हा शेतकऱ्यांचा हक्क असून प्रशासनिक दिरंगाईमुळे तो नाकारला जात होता, अशी परखड भूमिका त्यांनी मांडली होती. त्यांनी मांडले होते की, त्यांच्या या मागण्यांची दखल घेत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने २३ मार्च २०२६ रोजी अधिकृत पत्र काढून निधी वितरणाची माहिती दिली. प्रशासकीय पातळीवर झालेल्या या हालचालीमुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यात थकीत रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचे अनेक शेतकऱ्यांनी स्वागत केले असून संघटनेच्या पाठपुराव्याबद्दल त्यांनी आभारही मानले आहे.

पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू…..

या निधीतून ३,२६,६६६ क्विंटल मका खरेदीसाठी २५४.५६ कोटी रुपये आणि १७,७८२ क्विंटल ज्वारीसाठी १७.८५ कोटी रुपये राज्य सहकारी महासंघ व आदिवासी विकास महामंडळाकडून प्रदान करण्यात आले आहेत. एकूण १३२.९३ कोटी रुपये आता संबंधित संस्थांना उपलब्ध झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा….

शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशासाठी आंदोलनाचा इशारा द्यावा लागतो हे दुर्दैवी आहे.१३२.९३ कोटी रुपये वितरित झाले असले तरी, त्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना त्रास झाला. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. येत्या ८ दिवसांत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण रक्कम जमा झाली नाही, तर राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल.