spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्मार्ट विद्युत मीटरमुळे विद्युत बिलात वाढ, नवनीत नगरचे नागरिक त्रस्त

– पोलीस स्टेशन व एमएसईबीला दिले निवेदन, आंदोलनाचा इशारा

वाडी :- नवनीत नगर, वाडी येथील विद्युत ग्राहकांना अलीकडे ग्राहकांची संमती न घेता बसविण्यात आलेल्या स्मार्ट विद्युत मीटरांमुळे नागरिकांना अवाजवी व वाढीव वीज बिलांचा सामना करावा लागत असल्याने नागरिक त्रस्त व आक्रोशीत झाले आहे. त्रस्त नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वी दरमहा सुमारे सरासरी 1,000 येणारे बिल आता थेट ₹3,500 ते ₹4,000 पर्यंत पोहोचल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. अनेक घरांमध्ये प्रत्यक्ष वीज वापर कमी असताना ही बिल वाढ झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या संतप्त नागरिकांनी या पार्श्वभूमीवर नुकतीच वाडी पोलीस स्टेशन तसेच महावितरण (एमएसईबी) वाडी कार्यालयात निवेदन देत त्वरित दिलासा देण्याची कारवाईची मागणी केली आहे.या निवेदनानुसार नवीन स्मार्ट मीटरांची तांत्रिक तपासणी तात्काळ करण्यात यावी. ज्या घरांमध्ये वापर अत्यल्प आहे, तेथून स्मार्ट मीटर काढून जुने मीटर पुन्हा बसवावे जारी करण्यात आलेली जादा बिले सुधारून योग्य बिल देण्यात यावे. भविष्यात ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय मीटर बदल करू नयेत.या समस्या संदर्भात नागरिकानी इशारा दिला आहे हि समस्या सोडवली नाही तर शांततामय आंदोलन व मोर्चा काढला जाईल.हि दोन्ही निवेदन देताना वाडी सह नवनीत नगर चे जागरूक नागरिक विनित गजभिये, आशीष पाटील, शैलेश थोराणे, गोलू गावडे, प्रिया पतले, संगीता येसकर, रीना बांगरे,प्रज्ञा मोटघरे, मनीष कुरसांगे, दीपक टेमबर्न, रितेश पटले, विवेक उरकुडे व मोठ्या संख्येने त्रस्त नागरिक उपस्थित होते.

Popular Articles