किशोर साहू, मौदा :- इलाईट पब्लिक स्कूल चाचेर येथे रक्षा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राष्ट्रपाल गजभिये यांच्या मार्गदर्शनात स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी दुर्गाप्रेम संस्थेचे सचिव गुप्तपाल गजभिये यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त मुलांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे देवेंद्र पानतावणे व संस्थेचे इतर पदाधिकारी लखन वाघमारे ,अमोल रामटेके, मिथुन पौनीकर उपस्थित होते. प्रास्ताविक शिक्षिका शबनम छवारे यांनी केले .आभार प्रदर्शन शिक्षिका नेहा पाल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पब्लिक स्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद भारती नारनवरे, आचल वाणी, निकिता कावरे, संतोषी बरबटे यांनी परिश्रम घेतले.








