spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भारताकडून पहिल्यांदाच ट्रेनवरुन अग्नी-प्राईमची चाचणी; आता अख्ख्या पाकिस्तानचा ‘टप्प्यात कार्यक्रम’

नवी दिल्ली: भारतासाठी एक अत्यंत गर्वाची बाब म्हणजेभारताने रेल्वे-आधारित मोबाईल लाँचर सिस्टमवरून मध्यम-श्रेणीच्या अग्नी-प्राईम क्षेपणास्त्र ाची यशस्वी चाचणी घेतली आहे. अग्नी-प्राईम क्षेपणास्त्र भारताच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) साठी विकसित करण्यात आले आहे. ओडिशातील चांदीपूर इंटिग्रेटेड टेस्ट रेंजमध्ये त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, अग्नी-प्राईम चाचणी ही विशेषतः डिझाइन केलेल्या रेल्वे-आधारित मोबाईल लाँचरवरून घेण्यात आलेली अशा प्रकारची पहिली चाचणी होती. पुढील पिढीतील अग्नी-प्राईम क्षेपणास्त्र 2000 किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यांवर मारा करू शकते. म्हणजेच या रेंजमध्ये संपूर्ण पाकिस्तान येतो.

विशेषतः डिझाइन केलेल्या रेल्वे लाँचरवरून हे क्षेपणास्त्र डागण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे भारत अशा काही देशांच्या पंगतीत जाऊन बसला आहे, ज्यांच्याकडे कॅनिस्टराइज्ड लाँच सिस्टम आहे, जी चालत्या ट्रेनवरुन क्षेपणास्त्रे डागण्यास सक्षम आहे. आतापर्यंत रशिया, चीन, उत्तर कोरिया या देशांनीच हे केलं आहे. आता यामध्ये भारताचाही समावेश झाला आहे. हे करणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे. अग्नी-प्राईम हे अग्नि मालिकेतील सर्वात नवीन आणि सर्वात प्रगत क्षेपणास्त्र आहे. हे 2000 किलोमीटरपर्यंतच्या श्रेणीचे मध्यम-श्रेणीचे क्षेपणास्त्र आहे. त्यात अनेक नवीन आणि प्रगत वैशिष्ट्ये आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.