Home Latest News भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकावर

भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकावर

0

<p>अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया मंगळवारी &lpar;२३ सप्टेंबर&rpar; ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला आहे&period; डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण मंगळवारी देखील कायम राहिली&period; रुपया आज २५ पैशांनी घसरून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ८८&period;५३ वर पोहोचला आहे&period; अमेरिकेने भारतीय आयातीवर लादलेलं ५० टक्के टॅरिफ &lpar;आयात शुल्क&rpar; आणि आता एच-१बी व्हिसावरील शुल्क १ लाख डॉलर्सपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर रुपया गडगडला आहे&period; गुंतवणूकदार टॅरिफमुळे आधीच गोंधळले होते&period; त्यातच आता एच-१बी व्हिसावरील शुल्क वाढवल्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत&period; याचा थेट भारतीय भांडवली बाजार व रुपयाच्या मूल्यावर परिणाम झाला आहे&period;<br &sol;>&NewLine;परकीय चलन आधारित व्यापार करणाऱ्या जागतिक गुंतवणूकदार व व्यावसायिकांनी सांगितलं की जागतिक स्तरावर आर्थिक जोखीम न पत्करण्याचं धोरण आणि व्यापार धोरणातील अनिश्चिततेमुळे रुपयाचं अवमूल्यन वाढलं आहे&period; इंटरबँक फॉरेन एक्सचेंजवर रुपया आज डॉलरच्या तुलनेत ८८&period;४१ या मूल्यावर उघडला&period; नंतर त्याची घसरण सुरू झाली आणि ८८&period;५३ वर पोहोचला&period; काल रुपया ८८&period;२८ या मूल्यावर बंद झाला होता&period; आज त्यात २५ पैशांची घसरण झाली आहे&period; सोमवारी देखील रुपयाची घसरण झाली होती&period; सोमवारी रुपयाचं १२ पैशांनी अवमूल्यन झालं होतं&period;<br &sol;>&NewLine;गंभीर परिणाम भोगावे लागणार&quest;<br &sol;>&NewLine;परकीय चलन व्यापाऱ्यांच्या मते अमेरिकेने एच-१बी व्हिसावरील शुल्क एक लाख डॉलर्स इतकं केल्यामुळे रुपया विक्रमी नीचांकी पातळीकडे घसरत चालला आहे&period; या नवीन नियमामुळे परदेशातून येणाऱ्या पैशांचा&comma; परकीय गुंतवणुकीच्या वाढीचा वेग मंदावू शकतो&period; तसेच याचा अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो&period; तसेच देशांतर्गत बाजारपेठेतील जोखीम टाळण्याचा दबाव वाढू शकतो&period; परिणामी भांडवली बाजाराची आणखी घसरण होईल&period;<br &sol;>&NewLine;भारतीय रिझर्व्ह बँक ही एकमेव डॉलर पुरवणारी संस्था आहे&period; या आठवड्यात ७&comma;५०० कोटी रुपयांचे काही किरकोळ आयपीओ बाजारात आले&comma; ज्यामुळे काही प्रमाणात परकीय चलन देशातं आलं&period; मात्र&comma; मोठ्या प्रमाणात डॉलरची खरेदी झाल्यामुळे बाजारात पुन्हा एकदा पोकळी निर्माण होऊ लागली आहे&period;<br &sol;>&NewLine;फिनरेक्स ट्रेझररी अ‍ॅडव्हायजर्स एलएलपीचे खजिनदार व कार्यकारी संचालक अनिल कुमार भन्साळी म्हणाले&comma; &OpenCurlyDoubleQuote;आरबीआय बऱ्याचदा थेट चलन हस्तक्षेप करत नाही&comma; किंवा हा हस्तक्षेप मर्यादित आहे&period; त्यामुळे रुपयाच्या किमतीत अस्थिरता दिसत आहे&period; रुपयाची आणखी घसरण होण्याची शक्यता आहे&period; आपल्याला यासाठी काही उपाययोजना राबवाव्या लागतील&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version