Home Latest News RSS वरील बंदी ते गांधींबरोबरचे संबंध, सरदार पटेलांचा होलोबॉक्स देतो क्लिष्ट प्रश्नांची...

RSS वरील बंदी ते गांधींबरोबरचे संबंध, सरदार पटेलांचा होलोबॉक्स देतो क्लिष्ट प्रश्नांची उत्तरं; नेमकं काय आहे तंत्रज्ञान?

0

<p><strong>Sardar Vallabhbhai Patel AI Holobox &colon;<&sol;strong> सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याचा सल्ला का दिला होता&quest; नेहरूंच्या जागी ते पंतप्रधान असते तर त्यांनी काय निर्णय घेतले असते&quest; महात्मा गांधी यांच्याबरोबर पटेल यांचे संबंध कसे होते&quest; अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे देशवासियांना मिळण्यास सुरुवात झाली आहे&period; विशेष बाब म्हणजे ही उत्तरे स्वत&colon; सरदार पटेल यांच्याकडूनच दिली जात आहेत&period; नवी दिल्लीतील तीन मूर्ती भवन परिसरातल्या ऐतिहासिक पंतप्रधान संग्रहालयात ही उत्तरे मिळत आहेत&period; त्यामुळे या संग्रहालयात अनेकजण भेट देत असल्याचे दिसून येत आहे&comma; पण हे नेमके कसे घडले&quest; सरदार पटेल नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे कसे देत आहेत&comma; त्यासंदर्भातील हा आढावा…<br &sol;>&NewLine;स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा एआय आधारित होलोबॉक्स पंतप्रधान संग्रहालयात व ग्रंथालयात उभारण्यात आला आहे&period; धोतर-कुर्ता आणि जॅकेट परिधान करून खांद्यावर शाल घेतलेले पटेल संग्रहालयात अगदी थाटात उभे आहेत&period; या होलोबॉक्समध्ये पटेल यांची अधिकृत ध्वनीफिती&comma; छायाचित्रे आणि व्हिडीओंचा वापर करण्यात आला आहे&comma; त्यामुळे अभ्यागतांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पटेल यांच्या मूळ आवाजातच ऐकायला मिळतात&period; एकेकाळी &OpenCurlyQuote;नेहरू मेमोरियल संग्रहालय आणि ग्रंथालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेचा नरेंद्र मोदी सरकारच्या काळात विस्तार करण्यात आला आहे&period; आता त्यात देशाचे सर्व पंतप्रधान आणि त्यांचे योगदान समाविष्ट करण्यात आले आहे&period; या संग्रहालयात सरदार पटेलांना विशेष स्थान देण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रश्न &colon; तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी का घातली होती&quest;<br &sol;>&NewLine;सरदार पटेल यांचा होलोबॉक्स सांगतो&comma; &OpenCurlyDoubleQuote;महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या व्यक्तीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आपला संबंध असल्याचा दावा केल्यानंतरच आरएसएसवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता&period; गांधींच्या हत्येमागचे सत्य शोधण्याच्या स्पष्ट हेतूने मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याचा सल्ला दिला होता&period; मात्र&comma; सखोल चौकशी केल्यानंतर असे निष्कर्ष निघाले की&comma; या हत्येच्या कटात संघाचा कुठलाही संबंध नव्हता&period; त्यावेळी मी तत्कालीन सरसंघचालक एम&period; एस&period; गोळवलकर गुरुजी यांच्याबरोबर चर्चा केली&period; संविधानाच्या चौकटीत राहूनच संघ आपले काम करेल याची हमी त्यांच्याकडून घेतल्यानंतर जुलै १९४९ मध्ये आरएसएसवरची बंदी उठवण्यात आली&period;”<&sol;p>&NewLine;<p>भाजपाचा प्रयत्न हास्यास्पद&comma; काँग्रेसची टीका<br &sol;>&NewLine;फाळणीनंतर देशाचे &OpenCurlyQuote;एकीकरण’ करणारे नेते म्हणून सध्याचे भाजपा सरकार सरदार पटेल यांना आपले आदर्श मानते&period; भाजपाने पटेल यांच्यावर हक्क सांगण्याच्या प्रयत्नांवर काँग्रेसने नेहमीच आक्षेप घेतला आहे&period; स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीतील भाजपाने कोणतीही भूमिका बजावली नाही&period; त्यांच्याकडून नेहमीच सत्य मिटवण्याचा प्रयत्न केला जातो असा आरोप काँग्रेसचे नेते करतात&period; &OpenCurlyDoubleQuote;सरदार पटेल यांची विचारसरणी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांच्या पूर्णपणे विरुद्ध होती&comma; त्यामुळे त्यांच्या वारशावर हक्क सांगण्याचा भाजपाचा प्रयत्न हास्यास्पद आहे”&comma; असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे एप्रिलमध्ये म्हणाले होते&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रश्न &colon; नेहरूंच्या जागी तुम्ही देशाचे पंतप्रधान असता तर काय केले असते&quest;<br &sol;>&NewLine;नेहरूंच्या जागी सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर त्यांनी अनेक गोष्टी अधिकच चांगल्या पद्धतीने हाताळल्या असत्या&comma; अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांसह उजव्या विचारसणीच्या लोकांची धारण आहे&period; या प्रश्नावर होलोबॉक्स अतिशय सावधपणे उत्तर देतो&period; &OpenCurlyDoubleQuote;राष्ट्रीय एकता सुनिश्चित करण्यावर आणि विविध समुदायांचे एकत्रीकरण करण्यावर माझा भर राहिला असता&period; अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि सामान्य माणसाला सक्षम करण्यासाठी मी कृषी आणि औद्योगिक विकासाला प्राधान्य दिले असते&comma;” असे पटेल सांगतात&period;<&sol;p>&NewLine;<p>गृहमंत्री म्हणून देशातील संस्थानांच्या एकीकरणात पटेल यांनी घेतलेल्या पुढाकारावर प्रश्न विचारल्यावर होलोबॉक्स त्याचे थोडेफार श्रेय नेहरूंना देतो&period; &OpenCurlyDoubleQuote;बहुतेक संस्थानांनी अखंड भारतामध्ये सामील होण्याचा लाभ समजून घेतला होता&period; संवाद&comma; मनधरणी आणि समजूतदारपणाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या चिंता दूर केल्या&period; या प्रक्रियेत नेहरू सहाय्यक भूमिकेत होते आणि त्यांनी अगदी लहान राज्यांच्या हितांची काळजी घेतली होती”&comma; असे होलोबॉक्स सांगतो&period;<br &sol;>&NewLine;प्रश्न &colon; महात्मा गांधी यांच्याबरोबरचे तुमचे संबंध कसे होते&quest;<br &sol;>&NewLine;महात्मा गांधी यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून नेहरूंना पसंती दिली होती असे मानले जाते&period; त्यावर गांधींबरोबरचे तुमचे संबंध कसे होते असा प्रश्न विचारला असता&comma; &OpenCurlyDoubleQuote;भारताच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही एकत्र काम केल्यामुळे आमचे नाते खूप घट्ट होते&period; अनेक प्रश्नांवरून आमच्यात थोडेफार मतभेद होते&comma; पण त्यामुळे आमचे संबंध अधिक मजबूत झाले&comma;” असे उत्तर होलोबॉक्स देतो&period; पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की&comma; सध्या दररोज सुमारे २० अभ्यागत संग्रहालयात येऊन पटेल यांच्या होलोबॉक्सशी संवाद साधतात आणि मायक्रोफोनवर हिंदी किंवा इंग्रजीमध्ये प्रश्न विचारतात&period; या होलोबॉक्सबद्दल अधिक लोकांना माहिती मिळाल्यावर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे&period; दररोज एक हजारहून अधिक लोक संग्रहालयाला भेट देत असून आठवड्याच्या शेवटी ही संख्या वाढत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>SOURCE &colon; LOKSATTA<&sol;p>&NewLine;

Exit mobile version