– साईबाबा आश्रम शाळेत तीन दिवसिय श्री साई बाबा मुर्ती स्थापन उत्सव
कन्हान :- साईबाबा आश्रमशाळा टेकाडी (को.ख.) येथे पटांगणात नव्याने बांधण्यात आलेल्या श्री साई मंदीरात श्री साईबाबा यांच्या मुर्तीची विधीवत स्थापना करून तीन दिवसीय उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
शनिवार (दि.११) ऑक्टोंबर सायंकाळी ४ वाजता साईबाबा आश्रमशाळा टेकाडी (को.ख.) ता. पारशिवनी जि. नागपुर येथिल पटांगणात नव्याने बांधण्यात आलेल्या श्री साई मंदीरातुन संकल्प रथ यात्रा व साई बाबा यांच्या पालखीचे भजन मंडळी सह मिरवणुकीने भ्रमण करण्यात येईल. रविवार (दि.१२) ऑक्टोंबर ला सकाळी ८ वाजता श्री साईबाबा मुर्तीचे विधीवत पुजन करून दिवस भर भजन, पुजा अर्चना करून सांयकाळी ४.३० वाजता मंदीरात श्री साईबाबा ची मुर्ती स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा करून सायंकाळी ५ वाजता आरती करून प्रसाद वितरण करण्यात येईल. सोमवार (दि.१३) ला सकाळी आरती , भजन, किर्तन करून दुपारी गोपाल काला करून २ ते ६ वाजे पर्यंत महाप्रसाद वितरण करण्यात येईल.श्री साईबाबा मुर्ती स्थापना उत्सव कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता आयोजक साईबाबा आश्रम शाळेचे संचालक किशोर रा. वानखेडे, समस्त वानखेडे परिवार व आश्रम शाळेचे शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद परिश्रम करित आहे.



