spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विद्दुत धक्क्याने इसमाचा मृत्यू

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आदर्श नगर येथे आमधरे यांच्या घराजवळील झाडावर इमलिबाग रहिवासी 56 वर्षीय इसम ऑटो घेऊन बकरी करिता चारा तोडून विक्री करण्यासाठी झाडावर चढले असता अचानक त्यांना विद्दुत धक्का लागल्याने खाली पडून डोक्याला मार लागून उजव्या हातातून रक्त निघू लागल्याची घटना सकाळी 11.45 वाजता घडली दरम्यान उपचारार्थ कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.मृतक इसमाचे नाव अर्षद कमाल मोहम्मद साबीर वय 56 वर्षे रा इमलीबाग कामठी असे आहे. सदर मृतकाच्या पार्थिवावर कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करन्यात आले.पोलिसांनी घटनेची नोंद करीत आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Popular Articles