spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

घरकुल निधी निर्गमित करा – राजेश जयस्वाल

– चार महिन्यांपासुन शासनाकडून निधीला ‘ ब्रेक ‘

– गोरगरीब घरकुल अनुदानाच्या प्रतिक्षेत

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक:- शासनाच्या घरकुल योजनेंतर्गत निधीतून घर उभारण्याचे स्वप्न पहाणाऱ्या विशेषतः ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना गेल्या चार महिन्यांपासुन शासनाकडून घरकुल योजनेंतर्गत निधी निर्गमित करण्यात आला नसल्याने गोरगरीबांचे घर उभारण्याची कामे सध्या खोळंबलेली आहे. तेव्हा घरकुल योजनेचा निधी लवकरात लवकर निर्गमीत करावा अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश जयस्वाल यांनी शासनाला केलेली आहे. शासन देत असलेल्या घरकुल योजनेच्या तोटक्या अनुदानातुन घर परिपुर्णरित्या उभारणे तर शक्य होत नाही, त्यासाठी लोकांना आपल्या जवळील पैसाही टाकावा लागतो असे सांगत सामाजिक कार्यकर्ते राजेश जयस्वाल पुढे म्हणाले की शासनाच्या घरकुल योजनेच्या अनुदानामुळे विशेषतः गोरगरीब जनतेला अर्थसहाय्यतेचा मोठा आधार मिळतो व त्यांचे घराचे स्वप्न पुर्ण होण्यास मदत होते हे तेवढेच खरे आहे. परंतु लाभार्थ्यांना गेल्या चार महिन्यापासून निधी मिळाला नसल्याने अनेकांच्या घरांची कामे ठप्प पडली आहे.

याबाबत पंचायत समिती, रामटेक येथून माहिती काढली असता सध्या ग्रामीण भागातील लोकांना घरकुल योजनेंतर्गत एक लक्ष विस हजार रुपये घर बांधकाम, सोबत सब्बीस हजार रुपये मजुरी व बारा हजार रुपये शौचालय बांधकाम असे एक लक्ष अठ्ठावन हजार रुपये अनुदान मिळत असते. ‘स्पर्श प्रणाली’ अॅक्टीव्हेट व्हायची होती त्यामुळे लोकांना घरकुल अनुदानाचे हप्ते मिळण्यास विलंब झाला व येत्या आठवड्याभऱ्यात घरकुल अनुदानाचे हप्ते लोकांना मिळणे सुरु होईल असे समजले.

असा भेदभाव का ? 

गावखेड्यात घर बांधायचे असल्यास संबंधीत साहित्य विक्रेता साहित्यांचे दर कमी लावेल व शहरात घर बांधायचे असल्यास तो तेच दर ज्यास्त प्रमाणात वाढवून लावेल का ? असा खोचक सवाल राजेश जयस्वाल यांनी शासनाला केलेला असुन मग शहरी भागातील लोकांसाठी अडीच लक्ष रुपये व ग्रामीण भागातील लोकांसाठी एक लक्ष अठ्ठावन हजार रुपये घरकुल अनुदानाची तरतुद का ? असा भेदभाव का ? अशा प्रश्नांचा भडीमार जयस्वाल यांनी शासनावर केलेला असुन ग्रामीणमधील घरकुल योजनेच्या निधीत सुद्धा वृद्धी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेश जयस्वाल यांनी यामाध्यमातुन शासनाला केलेली आहे.

Popular Articles