सचिन चौरसिया, रामटेक ४ :- तालुक्यातील नरेगा अंतर्गत झालेल्या कामाचे ऑडिट गावा, गावा मध्ये, जाऊन नुकतेच शनिवार (दि. ३०) आगस्टला जनसुनावणी घेण्यात आली, या जन सुनावणी मध्ये सर्व मुद्दे निकाली काढण्यात आले. कामाचे अंकेक्षण महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत मा. संचालक, महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेशन व पारदर्शकता सोसायटी, मंत्रालय मुबंई. यांच्या वतीने २१ जुलै ते २८ आगस्ट पर्यंत पार पडली. जन सुनावानी येथील हमलापुरी मातोश्री चारिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष सुनील बाद्दुले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपाध्यक्ष म्हणून जयश्री मेंगरे तसेच महिला जन प्रभाग सचिव सत्यभामा आष्टणकर तसेच सामजिक अंकेक्षण अधिकारी जितेंद्र रागोरते, नरेगाचे सहाय्यक अधिकारी (APO) अर्जुन खेवले, तांत्रिक अधिकारी प्रमोद गोल्हर, रतन अंबागडे, चमन मेश्राम, राम देशमुख, शुभम खडसे आणि तालुक्यातील संपूर्ण रोजगार सेवक ग्रामसेवक उपस्थित होते. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अर्जुन खेवले यांनी पंचायत समिती रामटेक च्या वतीने सर्वांचे आभार मानले
हमलापुरी येथे सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेतील मुद्दे निकाली


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



