नागपूर प्रतिनिधी ता ३ : कळमणा पोलिसांनी केलेल्या कारवाईत वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून, एका आरोपीला अटक करण्या
त आली आहे. या आरोपीकडून एकूण १,०५,००० रुपये किमतीची तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत.
ही घटना ३० ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री १२:१० ते सकाळी ७:३० च्या दरम्यान घडली. फिर्यादी अंकुश राजेश पिल्लारे (वय १८, रा. साईकृपा सोसायटी, भरतवाडा, कळमणा, नागपूर) यांच्या घरासमोरून त्यांची ४०,००० रुपये किमतीची होंडा अॅक्टिवा (क्र. एम.एच. ४९ टी ०६६२) चोरीला गेली होती. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमणा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक तपासामुळे आरोपी जेरबंद
या गुन्ह्याचा तपास करताना कळमणा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पोलिसांनी भूपेंद्र राधेलाल यादव (वय २४, रा. भवानी नगर, पारडी, नागपूर) याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. अधिक चौकशी केली असता, त्याने कळमणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदिवासी प्रकाश नगर येथून हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल (क्र. एम.एच ४९ व्ही.एच २५४५) आणि सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नंबर प्लेट नसलेली हिरो स्टँडर्ड मोटरसायकल चोरी केल्याचेही कबूल केले.
पोलिसांनी आरोपीकडून एकूण तीन वाहने, ज्यांची एकूण किंमत १,०५,००० रुपये आहे, जप्त केली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ही यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण काळे, पोलीस उपनिरीक्षक संतोषकुमार रामलोड, पोलीस हवालदार रविकुमार शाहू, प्रदीप पवार, पोलीस अंमलदार मंगेश लोही, संतोष पांडे, प्रफुल्ल गोहकर आणि अनिल जाधव यांनी पार पाडली.
|
|




