spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘मिस प्राईड ऑफ महाराष्ट्र 2026’ मध्ये कामठीच्या लेकींची ऐतिहासिक दुहेरी कामगिरी

– तोशिका तुरस्कर ठरली ‘मिस परफेक्ट’, तर कांमठीच्या माही बोरकरने पटकावला ‘मिस ब्यूटीफुल हेअर’ किताब

कामठी :- नागपूर येथे 14 जून 2026 रोजी झालेल्या ‘मिस प्राईड ऑफ महाराष्ट्र – सीझन 6’ या भव्य सौंदर्य स्पर्धेत कामठीच्या दोन लेकींनी ऐतिहासिक यश संपादन करत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कामठीच्या तोशिका तुरस्कर हिने ‘मिस प्राईड ऑफ महाराष्ट्र – मिस परफेक्ट 2026’ हा किताब पटकावला, तर माही बोरकर हिने ‘मिस प्राईड ऑफ महाराष्ट्र – मिस ब्यूटीफुल हेअर 2026’ हा प्रतिष्ठेचा सब-टायटल मिळविला.

मुंबई, दिल्ली, चंदीगड, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसह देशभरातून आलेल्या स्पर्धकांमध्ये अत्यंत चुरशीची स्पर्धा रंगली होती. अशा कडव्या स्पर्धेत कामठीच्या दोन्ही लेकींनी आपल्या व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास आणि प्रतिभेच्या जोरावर यश संपादन करून इतिहास घडविला.

तोशिका तुरस्कर हिने आपल्या प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर ‘मिस परफेक्ट’चा किताब मिळविला, तर माही बोरकर हिने आपल्या आकर्षक व सुंदर केसांमुळे ‘मिस ब्यूटीफुल हेअर’ हा मानाचा किताब पटकावला.

या दुहेरी यशाची बातमी समजताच कामठी शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, दोन्ही विजेत्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

‘स्टार वॉक पूनम प्रोडक्शन’च्या बॅनरखाली पूनम गोकुळपुरे यांनी ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र – सीझन 6’चे आयोजन मोठ्या उत्साहात केले होते. या स्पर्धेत मिस्टर, मिस, किड्स आणि मिसेस अशा विविध गटांमध्ये तीन फेऱ्यांत स्पर्धा घेण्यात आली. नागपूर, अमरावती, कामठी, वर्धा आणि परिसरातील अनेक स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या कार्यक्रमात 16 डिझायनर्सच्या वेगवेगळ्या पोशाखांमध्ये रॅम्प वॉकचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षक म्हणून छत्तीसगडच्या आलिया परवीन, दिल्लीचे गगनदीप सिंह, डॉ. रिचा जरिया आणि दिग्दर्शक प्रदीप पाली उपस्थित होते. स्पर्धकांना आकाश मेघवानी, साक्षी बहल आणि अन्सारी सर यांनी ग्रूमिंगचे प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमादरम्यान सेलिब्रिटी अवॉर्डचे वितरणही करण्यात आले. तसेच, ‘स्टार वॉक पूनम प्रोडक्शन’ आणि आलोक शर्मा यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या एका लघुपटाचेही लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमात 200 हून अधिक मान्यवर आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.

Popular Articles