spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कांद्री ते धापेवाडा पदयात्रा व हरिभजन सोहळा उत्साहात संपन्न

कन्हान :- नगरपंचायत कांद्री येथील श्री.संत गजानन महाराज मंदिर, प्रभाग क्रमांक २ कांद्री येथुन कन्हान, कामठी मार्गे पाटनसांवगी ते श्रीक्षेत्र विठ्ठल रखुमाई मंदिर धापेवाडा (विदर्भाचे पंढरपूुर) येथे संत गजानन महाराजांची पालखी पायदळ वारी काढुन सायंकाळी ७ वाजेपर्यंत श्री क्षेत्र विठ्ठल रखुमाई मंदिर,धापेवाडा येथे मंदिर प्रदक्षिणा घालुन, संत गजानन महाराज मंदिर धापेवाडा येथे थांबा होऊन उपस्थितीत मंडळीस भोजनाची व्यवस्था करण्यात आली आणि रात्री ९ वाजता पालखी सोबत असणारी भजन मंडळी यांनी हरी भजनाचा कार्यक्रम सादर करून रात्री १२ वाजता दहीहंडी कार्यक्रम जेष्ठ नागरिक व मार्गदर्शक फजित बावने यांचे हस्ते करण्यात आला.

प्रामुख्याने या पालखी पायदळ वारी सोहळ्यात कांद्री, बोरडा, बोरी, निमखेडा, बखारी, टेकाडी तसेच महिला बचत गट, पारायण मंडळे आणि परिसरातील मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. कार्यक्रमास केने बंधु, रविंद्र कोतपल्लीवार, शिवशंकर चकोले, मोहित वर्तेकर, निलेश कुंभलकर, ओमप्रकाश काकडे तसेच नगराध्यक्ष सुजित पानतावणे यांनी कांद्री, कन्हान येथे पालखी पायदळ वारीचे स्वागत करून प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रफुल्ल गायकवाड, नरेश डांगरे, फजित बावणे, धनराज शिरसागर, नरेंद्र वानखेडे, विजय देशमुख, निलेश गाढवे, श्रीराम कोतपल्लीवार, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील गि-हे, राकेश पोटभरे, प्रविण आकरे, ऋषी चकोले, संजय गि-हे, विलास मस्के, प्रविण सरोदे, झिबल कुंभलकर सह समस्त भाविकांनी परिश्रम घेतले.

Popular Articles