spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कांद्रीत गुरुपूजनासह शाहिर-कलावंताचा मेळावा उत्साहात

– शिवशक्ती डाहाका मंडळाचा उपक्रम ; गीत, भजनांनी रंगला सांस्कृतिक सोहळा

कन्हान :- शाहिरी, भजन आणि लोककलेच्या माध्य मातुन समाज प्रबोधनाची परंपरा जपणाऱ्या शिवशक्ती डाहाका मंडळ कांद्री-कन्हानच्या वतीने खदान रोड श्री हनुमान मंदिर देवस्थान परिसरात गुरुपूजन सोहळा व शाहिर-कलावंतांचा मेळाव्याचे आयोजन उत्साहात करण्यात आले. स्व. भीमराव बावनकुळे यांना अभिवा दन करून शाहिर व कलावंताचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय कलाकार शाहिर मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र बावनकुळे च्या हस्ते स्व. भीमराव बावनकुळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. तदंतर उपस्थित शाहिर व भजन मंडळांनी देशभक्तीपर, समाज प्रबोधनपर गीताचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. शाहिरी व लोककलेच्या सादरीकरणाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. लोक कलावंतानी आपल्या कला विष्कारातुन लोक परंपरा आणि समाज प्रबोधनाचा संदेश दिला. गुरुपूजनाच्या परंपरेला उजाळा देत शाहिरी, भजन आणि लोककलेचे जतन व संवर्धन करण्याचा संदेश या मेळाव्यातुन देण्यात आला. कलावंताच्या सादरी करणाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत कार्यक्रमास भर भरून प्रतिसाद दिला. यावेळी शाहिर विक्रम वाढरे, गिरिधर बावने, शालिकराम शेंडे, रविंद्र दुपारे, भूपेश बावनकुळे, प्रफुल्ल भनारे, प्रतिक सावरकर, भोजराज घरजाळे, हुकुमचंद ठाकरे, ब्रह्माजी नवघरे, धर्मराज आपुरकर, सेवकराम नेवारे, विजय चकोले, नृत्य कला कार आशीष निंदेकर, वैभव मेश्राम, शाहिर मधुकर शिंदेमेश्राम, रामेश्वर उमाटे, निलेश वांढरे, शाहिर हरिचंद पारधी, जयराम सानेकर, गणेश शिंदेमेश्राम, धन राज मोहड, भिवनाथ शेदुरकर, सुरेश इंगळे, गोपिचंद सोनवाणे, भाऊराव कोंचे आदींचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वंदना घुमडे, मीना कुंभलकर, अरुणा बावनकुळे, गजानन वडे, वामन देशमुख, मनोहर सरोदे, हिरामन मदनकर, देवराव आखरे, वासुदेव आखरे, एकनाथ सरोदे, हिरामान बावनकुळे, दशरथ पुंडे, राजेंद्र लक्षणे, शिवाजी लक्षणे, भिकाजी गोडाने सह जेष्ठ कलावंत, मान्यवर, नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.