कन्हान २८ : – नशामुक्त नागपुर करण्यासाठी पोलीस आयुक्त मा. रविंद्र सिंगल सर (सी पी) यांनी नागपुर जिल्हयात “ऑपरेशन थंडर” मोहिम राबविण्यात आली. यात संकल्प व्यसन मुक्ती केंद्र हिंगणा ” येथे सामाजिक जवाबदारी म्हणुन सेवा देणारे कन्हान चे मनिष निंबाळकर यास सामाजिक कामात सर्वोउत्कृष्ट सहभागासाठी “ऑपरेशन थंडर” पुरस्काराने गौरवन्वि त आले. नशामुक्त नागपुर करण्यासाठी पोलीस आयुक्त मा. रविंद्र सिंगल सर यांचा अंतर्गत “ऑपरेशन थंडर” २६ जुन २०२५ ला आंतरराष्ट्रीय नशामुक्ती दिना निमित्त करण्याची घोषणा केली होती. यां मागील कारण तरुण युवक-युवती शहरांत अंमली, मादक व्यसनाचा आहारी गेल्याची आढळळी ते नियंत्रात आणावी म्हणुन “ऑपरेशन थंडर” प्रामाणिक जवाब दारीने शहर आयुक्त यांनी राबवली, यात विविध व्यसन मुक्ती केंद्रातील कार्यरत मंडळी घेतली होती. बऱ्याच प्रमाणात यशा नंतर बुधवार (दि.२०) ऑगस्ट २०२५ ला आयुक्त शहर पोलीस नागपुर व्दारे ‘नेशनल फायर कॉलेज, राजनगर नागपुर येथे प्रमुख पाहुणे, मुख्य मार्गदर्शक व कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री. डॉ. प्रकाश आमटे सर सह अनेक मान्यवराच्या प्रमुख उपस्थितीत “संकल्प व्यसन मुक्ती केंद्र हिंगणा नागपुर” येथे सामा जिक जवाबदारी म्हणुन सेवा देणारे कन्हानचे मनिष ताराचंद निंबाळकर ला ‘ऑपरेशन थंडर ‘ यां सामाजि क कामात नागपुर शहराचा सर्वोउत्कृष्ट सहभागासाठी पद्मश्री. डॉ. प्रकाश आमटे, आणि डॉ. रविंद्र कुमार सिंगल (आयपीएस) यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्या चे होते, परंतु मनिष निंबाळकर व्यसनमुक्ती उपचारा करिता रुग्ण घ्यायला छत्तीसगड रायपुर ला गेल्यामुळे ते स्वतः सन्मान पुरस्कार घेण्यास उपस्थित नसल्याने त्यांच्या वतीने संकल्प व्यसनमुक्ती केंद्र हिंगना नागपुर चे संस्थापक अध्यक्ष मा. प्रविण टीप्रमवार यांनी हा पुरस्कार स्विकारारून नंतर मनिष निंबाळकर यास देण्यात आला आहे.


