spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मकरधोकडा येथे कारधा पोलिसांची मोठी कारवाई; २४० किलो मोहा सडवा जप्त

हंसराज,भंडारा :- जिल्ह्यात अवैध दारू निर्मितीविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेतंर्गत, कारधा पोलिसांनी मौजा मकरधोकडा येथे धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. वैनगंगा नदीच्या काठावर सुरू असलेल्या या अवैध अड्ड्यावर पोलिसांनी २४० किलो सडवा मोहापास जप्त केला असून, याची किंमत सुमारे ४८ हजार रुपये आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मकरधोकडा येथील वैनगंगा नदीच्या पात्रात अवैध मोहा सडवा असल्याची गोपनीय माहिती कारधा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली. यावेळी नेहाल प्रकाश बनसोड (वय ३२, रा. मकरधोकडा) याच्या ताब्यातून ४८ हजार रुपये किमतीचा २४० किलो सडवा मोहापास हस्तगत करण्यात आला.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कारधा पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.

या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास कारधा पोलीस करत आहेत.

Popular Articles