spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बेकायदेशीर रेती वाहतुकीवर कारधा पोलिसांचा दणका; १० लाखांचा मुद्देमाल जप्त मौजा बेलगाव शिवारात मिनी ट्रक पकडला; एकावर गुन्हा दाखल

हंसराज भंडारा: कारधा पोलिसांनी बेलगाव परिसरात अवैध रेती वाहतुकीविरुद्ध कारवाई करत एक मिनी ट्रक जप्त केला आहे. या कारवाईत एकूण १० लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पवन कंठीराम हजारे (२५, रा. सुरेवाडा, भंडारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारधा पोलीस ठाण्याचे पथक बेलगाव परिसरात गस्त घालत असताना त्यांना रेतीच्या चोरट्या वाहतुकीबाबत गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचासमक्ष एका मिनी ट्रकची तपासणी केली. यावेळी ट्रकच्या ट्रॉलीमध्ये कोणताही परवाना नसताना अवैधरीत्या रेतीची वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. रेतीची चोरटी वाहतूक करून पर्यावरणाचे नुकसान केले जात असल्यामुळे पोलिसांनी हा ट्रक जप्त केला.

या कारवाईत पोलिसांनी १० लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड कंपनीचा पांढऱ्या रंगाचा मिनी ट्रक (क्रमांक MH 36 AA 5219) आणि त्यातील ६ हजार रुपये किमतीची एक ब्रास रेती असा एकूण १० लाख ६ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी कारधा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ५९९/२६ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई गडदे यांनी केली. प्रकरणाचा पुढील तपास कारधा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.