spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वरठीत अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; २५ लाखांच्या मुद्देमालासह टिप्पर जप्त

– स्थानिक गुन्हे शाखेची मौजा दाभा येथे धडक कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

हंसराज भंडारा :- वरठी पोलीस ठाण्यांतर्गत मौजा दाभा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने रेती वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत २५ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गंगवानी आणि त्यांचे पथक परिसरात गस्त घालत होते. यावेळी मौजा दाभा येथील नायरा पेट्रोल पंपसमोर दाभा ते वरठी रस्त्यावर एका टिप्परमधून विनापरवाना रेतीची वाहतूक केली जात असल्याची  गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित ट्रक थांबवला. तपासणी केली असता, टिप्परमध्ये शासनाच्या अधिकार क्षेत्रातील रेती भरलेली होती, मात्र चालकाकडे रेती वाहतुकीचा कोणताही वैध परवाना आढळून आला नाही.

या कारवाईत पोलिसांनी आकाश उत्तम आथीलकर (२५, रा. गोपीवाडा, भंडारा) आणि रूपेश मुकूंदा मारवाडे (३५, रा. गुंजेपार, भंडारा) यांच्यावर कारवाई केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून २५ लाख रुपये किमतीचा पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा टाटा कंपनीचा १२ चक्का ट्रक (क्रमांक MH 40DC4213) आणि ट्रकमध्ये असलेली १० ब्रास रेती (किंमत ६० हजार रुपये) असा एकूण २५ लाख ६० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

या प्रकरणी वरठी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३७२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) आणि ४९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास वरठी पोलीस विभागाचे  अधिकारी करत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.