spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

करडी पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

हंसराज,प्रतिनिधी भंडारा करडी  :- अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका टिप्परवर करडी पोलिसांनी धडक कारवाई केली असून, एकूण ३० लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी प्रकाश रूपचंद नेरकर (वय ३७, रा. बेटाळा, ता. मोहाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी तांगडे हे गस्तीवर असताना निलज बुज गावाकडे जाणाऱ्या फाट्यावर संशयास्पद टाटा टिप्पर (क्रमांक एम एच ३४ ए बी ४२२७) येताना दिसला. हा टिप्पर थांबवून तपासणी केली असता, त्यात विना परवाना अंदाजे ४ ब्रास रेती आढळून आली. हा माल देव्हाडा बुजकडून करडीकडे नेला जात होता. यावेळी आरोपीने वाहन बेदरकारपणे चालवून अपघातही केला.

या कारवाईत ३० लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा टिप्पर आणि २४ हजार रुपयांची रेती, असा एकूण ३० लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध करडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५६/२०२६, कलम २८१, ३०३ (२) बी.एन.एस. नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागलोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक फरताडे, पोलीस कर्मचारी तांगडे आणि करडी पोलीस पथकाने केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Popular Articles