spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

UPSC परीक्षेत करमाळ्यातील शेतकऱ्याच्या लेकाची यशाला गवसणी

– देशात 25 वे स्थान, तर सांगोल्यातील सौरभची पाहिल्याच प्रयत्नात चमकदार कामगिरी

सोलापूर :- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या वैद्यकीय सेवा परीक्षेत करमाळ्यातील डॉक्टर भगवंत गणेश पवार या शेतकऱ्याच्या मुलाने देशात 25 वे स्थान पटकावत घवघवीत यश संपादन केलंय. तर सांगोल्यातील शिक्षकाचा मुलगा असलेल्या सौरभ निंबाळकर याने 77 वी रँक मिळवत पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून झालेल्या वैद्यकीय सेवा परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलांनी मिळवलेल्या या यशाबाबत सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान, डॉक्टर भगवंत पवार हे करमाळा तालुक्यातील वडशिवणे गावातील शेतकरी कुटुंबातील एक होतकरू विद्यार्थी असून त्यानेही आपल्या पहिल्याच प्रयत्नात संपूर्ण देशात 25 वा नंबर मिळविला आहे. डॉक्टर सौरभ निंबाळकर हा देखील सांगोल्यासारख्या ग्रामीण भागातून आलेला तरुण असून त्यानेही पहिल्याच प्रयत्नात देशात 77 वा नंबर मिळविला आहे. सातत्य, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर मिळालेल्या या यशाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

मोहाडीतील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील घाणीनं विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात, संतप्त विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि अभ्यासिका केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि घाण पसरल्यानं अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. भंडाऱ्याच्या मोहाडी नगरपंचायत प्रशासनाच्या वतीनं हुतात्मा स्मारक इथं अभ्यासिका आणि मार्गदर्शन केंद्र उभारलं आहे. त्यामुळं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या परिसरात असलेली दुर्गंधी तात्काळ दूर करावी आणि अभ्यासिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या आरोग्यासाठी परिसर स्वच्छ आणि सुंदर करून चांगल्या वातावरणाची निर्मिती करून द्यावी, या मागणीला घेऊन अभ्यासिकेच्या संतप्त विद्यार्थ्यांनी नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना चांगलेचं धारेवर धरलं.

दरम्यान, या अभ्यासिका केंद्राच्या परिसरातचं नगरपालिका प्रशासनाच्या कचऱ्याच्या गाड्या आणि इतरही वाहनं धुतल्या जात असल्यानं तिथं पाण्याचे डबके निर्माण होऊन आरोग्याच्या समस्या उद्भवत असल्याचा आरोप या संतप्त विद्यार्थ्यांनी केला आहे.

Popular Articles