कामठी :- स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल कॉलेज यावर्षी आपल्या स्थापनेचा हिरक महोत्सव साजरा करत असून याअंतर्गत वार्षिक स्नेह संमेलन म्हणजेच केसरी कलारंग २०२६ चे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य व उद्घाटक प्रा. डॉ. स्वप्नील दाहात यांच्याहस्ते करण्यात आले. त्यांनी पोरवाल महाविद्यालयाच्या सहा दशकांचा उपलब्धींचा गोषवारा विषद करतांना राष्ट्रीय, अंतराष्ट्रीय स्तरावर येथील विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी बजावत असून केसरी कलारंगातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुंणाना चालना मिळेल तेव्हा बहुसंख्येने विद्यार्थ्यांना केसरी कलारंगच्या विविध स्पर्धेत भाग घेण्याचे त्यांनी आव्हान केले. यावेळी मंचावर उपस्थित उपप्राचार्य डॉ. मनीष चक्रवर्ती, डॉ. रेणु तिवारी, आय. कयू. ए. सी. समन्वयक डॉ. प्रशांत धोंगळे, प्रबंधक स्वप्नील राठोड यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांचे मनोबल वृद्धींगत करतांना स्पर्धेत सहभागी होणे जिंकण्या इतकेच महत्वाचे आहे, असा संदेश एक सुरात दिला. केसरी कलारंग २०२६ चे मुख्य समन्वयक डॉ. इफ्तेखार हूसेन यांनी चारदिवसीय केसरी कलारंग २०२६ मध्ये घेण्यात येणार्या विविध स्पर्धेची माहिती देतांना यशस्वीतेसाठी विविध स्पर्धेचे समन्वयक कठीण परिश्रम घेत आहे अशी माहिती दिली. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन पूर्वी कडबे तर आभार डॉ. गिजाला हाशमी यांनी मानले.








