spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खैरे कुणबी समाज पश्चिम नागपूरतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रविवारी

नागपूर :- खैरे कुणबी समाज पश्चिम नागपूरच्या वतीने सन २०२५ – २६ शैक्षणिक वर्षात दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. ७ जून रोजी सकाळी १० वाजता. कुसुमताई मंगल कार्यालय, अलंकार टॉकीज समोर, नागपूर येथे संपन्न होणार आहे. विशेष बाब म्हणजे या सत्कारासाठी गुणांची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नसून दहावी किंवा बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचाली साठी प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमा मागील उद्देश आहे. खैरे कुणबी समाज पश्चिम नागपूरचे मुख्य संघटक महादेव वैद्य यांनी समाजातील सर्व विद्यार्थी, पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे.

Popular Articles