नागपूर :- खैरे कुणबी समाज पश्चिम नागपूर संघटनेतर्फे दिनांक 19 फेब्रुवारीला शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती प्रित्यर्थ निलेश महाजन यांचे वरदान बिल्डकॉम ऑफिस, खरे टाऊन धरमपेठ, नागपूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी निलेश महाजन (उद्योजक) व प्रमुख पाहुणे महादेव वैद्य (संघटक), दशरथ उताणे उपस्थित होते. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनावर प्रबोधन करण्यात आले. याप्रसंगी सर्वश्री कमलाकर बोरकुटे, राजेश पिंपळे, गिरीश कावळे, रमेश चौधरी, रामचंद्र भोयर, स्वप्निल रोहणकर, भागवत कारमोरे, प्रदीप महाजन, दिलीप सहारे, ज्ञानेश्वर शेंडे, विनोद चौधरी, घनश्याम फरकाडे, रवी बोरकुटे, आदि खैरे कुणबी समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रम उत्साहात पार पडला.
खैरे कुणबी समाज पश्चिम नागपूर तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजन संपन्न


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



