– नगरपरिषद ७५ लाख रुपयांच्या पारितोषिकाची मानकरी, माझी वसुंधरा अभियानात खापा सलग तिसऱ्यांदा अव्वल
खापा, वार्ताहर :- पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या गटात खापा नगरपालिकेने सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत नागपूर विभागात प्रथम क्रमांक तर राज्यात सातवा क्रमांक पटकावला आहे. अभियान प्रभावीपणे राबवल्याबद्दल खापा नगरपालिकेला ७५ लाखाचे पारितोषिक मिळाले आहे.
पृथ्वी, अग्नी, वायू, जल आणि आकाश या पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान ५.० हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबर २०२० पासून राबविण्यात येत आहे. गतवर्षी माझी वसुंधरा अभियान ३.० मध्ये खापा शहराला नागपूर विभागात प्रथक क्रमांक तसेच राज्यात १३ क्रमांक पटकावला होता. तसेच माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये राज्यात ९ वा क्रमांक पटकावला होता. तीच विजयी घोडदौड यंदाही कायम ठेवलेली आहे. खापा येथे १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या काळात माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये तत्कालीन मुख्याधिकारी किरण बगडे व सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे वतीने राबविण्यात आले. त्यांच्या योगदानामुळे नगरपालिकेने नागपूर विभागातून प्रथम क्रमांकावर झेप घेतली आहे. मागील माझी वसुंधरा अभियानात २.०, ३.०, ४.० मध्येही खापा नगरपरिषदेने सुद्धा पुरस्कार पटकावला होता. यावर्षीही नगरपालिकेने ७ वा पुरस्कार प्राप्त केला आहे.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा हस्ते, मुंबई येथे प्राप्त होणार आहे. तसेच प्राप्त रक्कमेतून पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन यांचाद्वारे प्राप्त शासन निर्णयाप्रमाणे पर्यावरण पूरक कामे करण्यात येणार आहे.
पारितोषिकाच्या रक्कमेतून होणार पर्यावरण पूरक कामे प्राप्त बक्षिस रक्कमेतून शहरात कामे करण्याकरिता ७५ लाखाचा धनादेश लवकरच राज्याचे पालिका या अभियानात गेल्या काही वर्षापासून सुंदर काम करीत आहे. त्यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी यांचे मार्गदर्शन व अधिकारी, कर्मचारी यांच्या बळावर हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार खापा शहरातील सर्व नागरिकांचे सहकार्य व अथक परिश्रमामुळे मिळालेला आहे. समोर देखील शहरातील नागरिकांनी नगर परिषदेला सहकार्य करण्याचे आवाहन करते. पुढील वर्षी राज्यातून प्रथम येण्यासाठी मी व माझे अधिकारी-कर्मचारी जोमाने प्रयत्न करु.
– सचिन राऊत, मुख्याधिकारी, न.प. खापा.




