spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भूमी अभिलेख विभागाचा मुख्यालय सहायक ७० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात; कुरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 

गडचिरोली ८ : शेतजमिनीच्या पोटहिस्स्याची मोजणी करून सातबारा वेगळा करून चालान देण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कुरखेडा येथील भूमी अभिलेख विभागाचा मुख्यालय सहायक रवींद्र सदाशिव दिनकोंडावार (वय ४२) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका नागरिकाने आपल्या जमिनीच्या पोटहिस्स्याबाबत मोजणी करून सातबारा वेगळा करण्यासाठी कुरखेडा भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. परंतु, संबंधित कामासाठी दिनकोंडावार याने त्याच्याकडे १ लाख रुपयांची लाच मागितली. लाच देण्यास नकार देत संबंधित व्यक्तीने गडचिरोली एसीबीकडे तक्रार केली.

५ ऑगस्ट रोजी पडताळणी केली असता लाचेची मागणी खोटी नसल्याचे स्पष्ट झाले. तडजोडीनंतर लाचेची रक्कम ७० हजार रुपये ठरली. ६ ऑगस्ट रोजी एसीबीने सापळा रचून रवींद्र दिनकोंडावार याला पंचासमक्ष लाच स्वीकारताना अटक केली. या प्रकरणी कुरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात व उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील आणि त्यांच्या पथकाने केली. या पथकात सहायक फौजदार सुनील पेद्दीवार, हवालदार राजेश पद्मगिरवार, किशोर जौंजारकर, स्वप्नील बांबोळे, संदीप उडाण, संदीप घोरमोडे, प्रवीण जुमनाके, हितेश जेट्टीवार, विद्या म्हशाखेत्री, ज्योत्स्ना वसाके, राजेश्वर कुमरे आणि चापले यांचा समावेश होता.

@filephoto

Popular Articles