spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

घरमालकानो सावधान!भाडेकरू चे करारनामे करून घ्या – पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे

कामठी :- बहुधा भाडेकरू घरमालकाने भाड्याने दिलेली मालमत्ता बळकावण्याच्या चर्चा ऐकिवास येतात तेव्हा घरमालकानो तुमची मालमत्ता भाड्याने देताना अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे.

भाडेकरूने घर बळकावणे किंवा भाडे न देणे अश्या समस्या टाळण्यासाठी सुरक्षात्मक दृष्टिकोनातून घरमालकानो भाडेकरुसह लेखी करारनामा करणे सर्वात महत्वाचे आहे असे मौलिक मार्गदर्शन जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांनी नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे आयोजित शांतता कमिटी च्या सभेत केले.

दरम्यान पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांनी सांगितले की भाडे करार करताना लेखी करार हा नेहमी नोंदणीकृत असावा ,तोंडी करारावर विश्वास ठेवू नका,भाडेकरूची पाश्वरभूमी तपासण्यासाठी पोलीस व्हेरिफिकेशन अनिवार्य आहे. करार सहसा 11 महिन्याचा करावा आणि तो संपल्यावर नूतनिकरण करावे.तेव्हा भाडेकरू आणि घरमालक यांच्यात भाडे देण्यावरून सुस्पष्टता असावी व दोघात कुठलाही वाद होऊ नये यासाठी कायदेशीर पद्धतीचा अवलंब करून करारनामे करून घ्या असे आवाहन करीत घरमालक व भाडेकरू यांच्यातील कायदेशीर बाबी सांगून मार्गदर्शीत केले. याप्रसंगी नगरसेवक अनिल सूर्यवंशी, नगरसेवक नियाज कुरेशी,माजी नगरसेवक इलाही बक्श, प्रा.दुर्योधन मेश्राम,सार्वजनिक भीम स्मुर्ती मंडळ कामठी चे अध्यक्ष नागसेन सुखदेवें, समाजसेवक आशिष मेश्राम, छावा मराठा संघटन चे पदाधिकारी नियाज सिंघानिया, इर्शाद कुरेशी,स्वर्णलता सुखदेवें,स्मिता मेश्राम,प्रेमलता शर्मा,मो यासीन,निलेश मेश्राम, आदी उपस्थित होते.सभेचे संचालन व आभार पोलीस कर्मचारी सूचित गजभिये यांनी केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.