Home Latest News फेज-२ मधील रीच-४ए मध्ये पहिल्या सेगमेंटच्या लाँचिंगला सुरुवात

फेज-२ मधील रीच-४ए मध्ये पहिल्या सेगमेंटच्या लाँचिंगला सुरुवात

0

<p><strong>नागपूर &colon;–<&sol;strong> नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या फ़ेज-२ अंतर्गत रीच-४ए मध्ये &lpar;प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्ट नगर&comma; एकूण लांबी ५&period;३१ कि&period;मी&period;&rpar; निर्माण कार्य जानेवारी २०२५ पासून सुरू करण्यात आले असून या रिच मध्ये भंडारा रोडवरील कारखाने&comma; कळमणा मार्केट&comma; सिम्बायोसिस विद्यापीठ तसेच हिंगणा&comma; बुटीबोरी&comma; कन्हान आणि नागपूर शहरातील इतर भागांशी मेट्रो द्वारे कनेक्टिव्हीटी सुधारण्यात मदत होईल&period;<&sol;p>&NewLine;<p>रीच-४ए मध्ये एकूण १९२ स्पॅन्सचा समावेश आहे&comma; ज्यामध्ये २ कि&period;मी&period; लांबीचा डबल डेकर देखील आहे&period; या रिच मधील सिव्हिल कार्ये २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे&period;महामेट्रोने नियुक्त केलेल्या मेसर्स कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीद्वारे रीच-४ए मध्ये सेगमेंट लाँचिंगचे कार्य सुरू करण्यात आले आहे&period; या महत्त्वपूर्ण टप्प्यात प्री-कास्ट केलेल्या काँक्रीट सेगमेंट्सचे उचलून व स्थापित करून व्हायाडक्ट तयार केल्या जात आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या रिच मधील पहिला स्पॅन ३१ मीटर लांब आहे&comma; जो ग्राउंड सपोर्टेड लॉन्चिंग सिस्टीम चा वापर करून उभारण्यात आला आहे&period; या ३१ मीटर लांबीच्या स्पॅनमध्ये एम50 ग्रेड काँक्रीटचे १८० घनमीटर आणि एफई550डी स्टीलचे २८&period;५ टन प्रमाण वापरण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>एकूण ११ स्वतंत्र सेगमेंट्स एकत्र करून हा ३१ मीटरचा स्पॅन तयार केला जातो&period; शेवटच्या सेगमेंटची रुंदी १&period;९७५ मीटर असून&comma; उर्वरित सेगमेंट्स ३ मीटर रुंद आहेत&period; प्रत्येक सेगमेंटचे वजन ३४ ते ४३ टन एवढे आहे&period; प्रत्येक सेगमेंट कास्टिंग यार्डमधून निर्माणाधीन साइटवर ट्रेलरद्वारे नेण्यात येतो&comma; यासाठी पेट्रोलिंग वाहन आणि ट्राफिक मार्शल्स सोबत असतात जे रस्त्यावरील वाहनचालकांचे सुरक्षिततेचे पालन सुनिश्चित करतात&period;<&sol;p>&NewLine;<p>२२० टन क्षमतेच्या क्रेनच्या सहाय्याने सेगमेंट्स उचलल्या जात आहेत&period; हे संपूर्ण कार्य अत्यंत काटेकोर सुरक्षा नियोजन&comma; जोखीम मूल्यांकन&comma; तसेच प्रमाणित उपकरणे व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांद्वारे पार पाडले जात आहे&period; ग्राउंड सपोर्टिंग सिस्टीमचा वापर करून एक स्पॅन पूर्ण करण्यासाठी – ज्यामध्ये सेगमेंट उचलणे&comma; ड्राय मॅचिंग&comma; अलाईनमेंट&comma; गोंद लावणे&comma; पोस्ट-टेन्शनिंग आणि स्पॅन लोअरिंग यांचा समावेश आहे ज्याला एकूण ७ दिवस लागतात&period;<&sol;p>&NewLine;<p>महत्वपूर्ण आहे कि&comma; रीच-१ए&comma; २ए&comma; २बी आणि ३ए या मध्ये सेगमेंट इरेक्शनचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे&period; आता रीच-४ए येथे सेगमेंट इरेक्शनची प्रक्रिया सुरू झाली आहे&comma; अशा प्रकारे नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा-२ अंतर्गत अंतिम व्हायाडक्ट स्ट्रेच म्हणून याचा समावेश झाला आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version