यासीन शेख, गोंदिया :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महान समाजसुधारक आणि मानवतेचे पुरस्कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञान, समता आणि न्यायाचे अखंड दीप आहेत, असे प्रतिपादन इंजि. आनंद चंद्रिकापुरे (तालुका सचिव, भारतीय जनता पार्टी, गोरेगाव) यांनी केले.डव्वा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त 13 एप्रिल 2026 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजकुमार बडोले होते. यावेळी सभापती चेतन वडगाये, जिल्हा परिषद सदस्य शैलेश नंदेश्वर, माजी उपसभापती शालिंदर कापगते, पुष्पमाला बडोले, क्विंनल मुनेश्वर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना इंजि. आनंद चंद्रिकापुरे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या प्रखर बुद्धिमत्तेच्या आणि अथक परिश्रमाच्या जोरावर समाजातील अन्याय, विषमता आणि अज्ञानाविरुद्ध लढा दिला. त्यांनी शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व देत “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश दिला, जो सहर्ष आजही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांच्या समान संधी देणे हेच बाबासाहेबांना खरी विचारांमुळे वंचित व शोषित घटकांना आदरांजली ठरेल, असे त्यांनी नमूद न्याय मिळाला आणि देशाला समानतेच्या केले. या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी डॉ. मार्गावर नेण्याचे कार्य घडले. इंजि. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस चंद्रिकापुरे यांनी युवकांना आवाहन केले पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या कार्याला की, बाबासाहेबांचे विचार आत्मसात अभिवादन केले. कार्यक्रमात बाबासाहेबांच्या करून शिक्षण, शिस्त आणिसामाजिक विचारांचे महत्त्व अधोरेखित करत बांधिलकी यांचा अंगीकार करावा. समाजहितासाठी एकजुटीने कार्य करण्याचा समाजातील भेदभाव दूर करून सर्वांना संकल्प करण्यात आला.
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा – बाबासाहेबांचा संदेश आजही प्रेरणादायी” – इंजि. आनंद चंद्रिकापुरे
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.