spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त कायदेशीर सेवा सप्ताहाचे आयोजन

यवतमाळ :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार नागेश वि. न्हावकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, यवतमाळ तर्फे “राष्ट्रीय विधी सेवा दिन” साजरा करण्यात आला. कार्यक्रमास दिपक एच. दाभाडे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश (व. स्तर), यवतमाळ उपस्थित होते.

या प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत ९ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत “कायदेशीर सेवा सप्ताह” राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या सप्ताहात पॅरा विधी स्वयंसेवकांकडून यवतमाळ शहर तसेच ग्रामीण भागात डोअर-टू-डोअर भेटीद्वारे नागरिकांना कायदेविषयक जनजागृती करण्यात येणार असून, मोफत विधी सहाय्य योजना व इतर प्राधिकरणाच्या उपक्रमांची माहिती दिली जाणार आहे.

कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी, पॅरा विधी स्वयंसेवक आणि न्यायालयीन अधिकारी उपस्थित होते.

Popular Articles