spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक

– जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापन

यवतमाळ :- जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारणापूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक- अ- मध्य उप- विभाग, वर्ष ११ अंक 32, गुरुवार, ऑक्टोबर 9, 2025/ 17, शके 1947 यानुसार सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित/प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक विषयक प्रस्तावित जाहिरातींचे प्रसारमाध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाणन करून घेणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये दूरदर्शन, उपग्रह वाहिन्या, केबल वाहिन्या, यू ट्यूब वाहिन्या, केबल नेटवर्क, आकाशवाणी, खासगी एफएम वाहिन्या, चित्रपटगृह, बल्क एसएमएस, व्हाइस एसएमएस, ), संकेतस्थळे आदींचा समावेश होतो.

जिल्ह्यात नगरपरिषद यवतमाळ, पुसद, वणी, उमरखेड, दिग्रस, पांढरकवडा, दारव्हा, घाटंजी, नेर-नबाबपूर, आर्णी व नगरपंचायत ढाणकी यांची सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी प्रस्तावित जाहिरातींचे पूर्व प्रमाणन, पेड न्यूजसंदर्भातील तक्रारी, प्रकरणांची चौकशी, त्यांचे निराकरण, देखरेख आदी कामे समिती करेल.

अति.जि. पोलीस अधिक्षक अशोक थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरूद्ध बक्षी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश नाटकर, संबंधित नगरपरिषद, नगरपंचायत यांचे निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी अक्षय चौरे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य अनंत मातले हे सदस्य असून, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार हे सदस्य सचिव आहेत.

प्रस्तावित जाहिरात प्रसारित/प्रसिद्ध करण्याच्या दिनांकापूर्वी किमान पाच दिवस आधी संबंधित समितीकडे तिच्या पूर्व प्रमाणनासाठी अर्ज करावा लागेल. पूर्व प्रमाणनाच्या अर्जासमवेत जाहिरातीची इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रत आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने किंवा उमेदवाराने साक्षांकित केलेल्या जाहिरात संहितेच्या दोन मुद्रीत प्रती जोडणे आवश्यक आहे.

Popular Articles