– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे.रविवार व सोमवार (ता.16व17)शोध पथकाने 72 प्रकरणांची नोंद करून 49,500 रुपयाचा दंड वसूल केला.हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 24प्रकरणांची नोंद करून 9,600 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. १००/- दंड) या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून 600 रुपयांची वसुली करण्यात आली.दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400 दंड) या अंतर्गत 5 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 15 प्रकरणांची नोंद करून 18,500 रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 10,000 रूपयाची वसूली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 14 प्रकरणांची नोंद करून 2,800 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 6 प्रकरणांची नोंद करून रु.6,000 चे दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत महेश मिश्रा यांनी रस्त्यालगत सी अँड डी कचरा टाकल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. तसेच मे.इंडो ग्रीन रेझॉलवेशन कंपनी यांनी जास्त प्रमाणात माती व चिखल रस्त्यावर पसरविल्यामुळे रू.10,000 दंड वसूल करण्यात आले. मे. ऑरकिड शिवनेरी लँडमार्क यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 दंड वसुल करण्यात आले. हनुमान नगर झोन अंतर्गत मे.साई समर्थ यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्याबाबत रू.10,000 दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे.हॅपी नेस्ट डेव्हलपर्स यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्याबाबत रू.10,000 दंड वसुल करण्यात आले. तसेच मे.आशा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी रस्त्यालगत सी अँड डी कचरा टाकल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले.गांधीबाग झोन अंतर्गत मे. दुर्गेश स्वीटस व मे.प्रताप स्वीटस यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी रू. 5,000 या प्रमाणे रू.10,000 चे दंड वसूल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे.विष्णु किराणा शॉप यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 चे दंड वसूल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 9 प्रकरणांची नोंद करून रू.65,000 दंड वसूल केला.




