spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खापा नगरपरिषदेत उमेदवारांची मोठी गर्दी; शेवटच्या दिवशी नामांकनाचा उत्साह शिगेला

खापा :- नगरपरिषद निवडणुकीसाठी काल नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच न.प. पटांगण परिसरात उमेदवार व कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. दहा वाजताच नामांकन प्रक्रियेला वेग आला आणि तीन वाजेपर्यंत विविध पक्षांच्या तसेच अपक्ष उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले.

भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), बहुजन समाज पार्टी यांच्यासह अपक्ष उमेदवारांनी आपापली उमेदवारी निश्चित करण्यासाठी जोरदार हालचाली केल्या. सदस्यपदासाठी देखील उत्साहात नामांकन दाखल होत असल्याचे चित्र दिवसभर दिसून आले.

अध्यक्षपदासाठी प्रमुख पक्षांकडून नामांकन दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये भाजपचे पीयुष बुरडे, अंकीता पीयुष बुरडे, राष्ट्रीय काँग्रेसचे रवींद्र कवडे, शिवसेना (शिंदे गट) चे खेमराज बारापात्रे, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे‌ मुकेश गायधनी तसेच अपक्ष उमेदवार म्हणून मुकेश पावडे उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्याच्या गडबडीत राजकीय तापमान चांगलेच चढल्याचे दिसून आले.

नामांकनाचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासून उमेदवार, समर्थक, पक्षनेते आणि प्रचार वाहनांच्या वर्दळीने न.प. पटांगण गजबजून गेले होते. सुरक्षा व्यवस्थेसह निवडणूक विभागानेही पूर्ण तयारीत काम सांभाळले.

नामांकन प्रक्रियेनंतर आता छाननी, अर्ज मागे घेण्याची मुदत आणि त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रचाराला वेग येणार आहे. खापा नगरपरिषद निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले असून शेवटच्या दिवशीची झालेली मोठी गर्दी ही आगामी निवडणुकीतील चुरशीची पूर्वसूचना मानली जात आहे.

नगरपरिषद नाव : खापा

नगराध्यक्ष आरक्षण : ओबीसी

नगराध्यक्षपदाचे उमेदवार (पक्ष) :

१) पीयुष बुरडे ( भाजपा)

२)अंकीता पीयुष बुरडे ( भाजपा)

३)खेमराज बारापात्रे (शिवसेना शिंदे गट)

४) रवींद्र कवडे (काॅग्रेस)

५) मुकेश गायधनी (उबाठा गट)

६) मुकेश पावडे (अपक्ष)

एकूण प्रभाग: १०, नगरसेवक संख्या : २०

एकूण मतदार : १३३५३

नगरसेवक पदाचे एकूण उमेदवार (संख्या) ६१ (आजपर्यंत आलेले सदस्य फार्म संख्या)

Popular Articles