spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

लोकमान्य विद्यालयाची वंशिका शेंडे नागपूर विभागात अजिंक्य

खापा :- विभागीय क्रीडा उपसंचालक , नागपूर विभाग यांच्याद्वारे कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशिमबाग, नागपूर येथे आयोजित विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये लोकमान्य विद्यालय, बडेगावची विद्यार्थिनी वंशिका लालाजी शेंडे, वर्ग आठवा हिने १४ वर्षे वयोगट व ५८ किलोग्राम वजन गटात नागपूर विभागातून अजिंक्य पद पटकावलेले आहे. तिची राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी नागपूर विभागातून निवड झालेली आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय शालेय प्रशासन, व्यवस्थापन व आपल्या आई-वडिलांना दिले आहे.

शाळेचे मुख्याध्यापक गजानन कुरवाडे, क्रीडा प्रशिक्षक सुरेंद्र बनसिंगे, शिक्षक नितीन निरगुडे, सचिन कुंथे, दिलीप इंगोले, विजय गिरी, शिक्षिका वर्षा ठाकरे, जया हुमणे यांनी वंशिका शेंडे हिचे अभिनंदन व कौतुक करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. सावनेर तालुक्यातून सर्व स्तरावरून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Popular Articles