spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मिशन लेडी थ्राईव्ह अंतर्गत महिला उद्योजकता जनजागृती

नागपूर :- महिला सशक्तीकरण उपक्रमाअंतर्गत एडुसन फाऊंडेशन व MSME विकास कार्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उद्यमिता जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन नवीन सुभेदार नागरी सहकारी पतसंस्था येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. काळे यांनी केले व त्याद्वारे कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश महिलांना स्वावलंबी, आत्मविश्र्वासी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे तसेच महिलांना उद्योग व्यवसायाच्या विविध संधी, शासकीय अनुदानित योजना आणि तांत्रिक मार्गदर्शन यांची ओळख करून देणे असे प्रास्ताविक केले. या प्रसंगी MSME विकास कार्यालय नागपूर येथील तज्ञ अधिकाऱ्यांमार्फत चर्चासत्रात विशेष मार्गदर्शन करण्यात आले होते. याकरिता MSME विकास कार्यालय नागपूर येथील सहाय्यक संचालक सुभाष इंगेवार, प्रदीप चेचरे ग्रामोद्योग अधिकारी KVIC नागपूर, अनिल पाटील व्यवस्थापक DIC नागपूर, एडुसन फाऊंडेशनचे संचालक डॉ. निलेश काळे, सहसंचालक सरोज काळे, जितेंद्र घडवाल शाखा व्यवस्थापक SBI Life इन्शुरन्स व संस्थेचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमा मध्ये मुख्य अतिथी माजी सभापती राजू नागुलवार तर विशेष अतिथी म्हणून समाजसेविका व विशेष कार्यकारी अधिकारी प्रितीताई प्रधाने यांची उपस्थिती लाभली. यशस्वी महिला उद्यमी हा सशक्त समाजाचा अविभाज्य घटक असून जास्तीत जास्त महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा, व्यवसाय वाढीकरिता लाभ घ्यावा. असे प्रतिपादन राजू नागुलवार केले. तर प्रीतीताई प्रधाने यांनी विविध उदाहरण देऊन महिला उद्यमी यांना व्यवसायामध्ये नवीन संधी शोधण्याकरिता प्रेरित केले. सहाय्यक संचालक सुभाष इंगेवार यांनी उत्तमपणे MSME च्या विविध आर्थिक योजना व व्यवसायाची रूपरेषा यावर तांत्रिक मार्गदर्शन केले. प्रदीप चेचरे व पाटील यांनी त्यांच्या विभागांतर्गत येणाऱ्या विविध आर्थिक व अनुदानित योजना यावर आधारित तांत्रिक माहिती दिली. जितेंद्र घेडवाल यांनी महिलांना व्यवसाय वाढीकरिता व उत्पन्न वाढीकरिता विशेष मार्गदर्शन केले तर डॉ. निलेश काळे यांनी व्यवसाय सुनिश्चित व सुरक्षित करण्याकरिता विशेष मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला बऱ्याच संख्येनी महिला उद्यमी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन प्रीती राऊत यांनी केले तर आभार घोडेस्वार यांनी मानले.

Popular Articles