तिरोडा २५ : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी तिरोडा – तिरोडा उपविभाग पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तिरोडा, गंगाझरी आणि दवणीवाडा पोलीस ठाणे हद्दीतील एकूण १६० धार्मिक स्थळांमधून बेकायदेशीरपणे लावलेले लाऊडस्पीकर हटविण्यात आले.
गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. यासाठी संबंधित पोलीस ठाणे क्षेत्रातील पोलीस अधिकारी आणि धार्मिक स्थळांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आणि त्यांना न्यायालयाचे आदेश समजावून सांगण्यात आले. जर लाऊडस्पीकर हटवले नाहीत तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले



