गोंदिया २५ : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तहसीलच्या दक्षिण टोकावर वसलेले आदिवासी बहुल गाव सोनेखारी (लोकसंख्या सुमारे ७५१) येथे पारंपरिक तान्हा पोळा उत्सव यंदा अविरत ११व्या वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील आदरणीय मंडळी, आया-बहिणी, बालगोपाल आणि विशेषत: नंदीधारक बालगोपाल यांच्या सहभागामुळे हा उत्सव अधिकच रंगतदार ठरला.
गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणावर हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच दिव्या पटले यांनी भूषविले. उपाध्यक्ष म्हणून सुखदेव गौतम (तंटामुक्ती अध्यक्ष) उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून लक्ष्मीकांत राऊत (उपसरपंच), महेंद्र भांडारकर (अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष), अनमोल इळपाते (पोलीस पाटील, सोनेखारी) यांच्यासह गावातील व परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
विशेष पाहुण्यांमध्ये रजनी कुंभरे (सभापती, समाज कल्याण विभाग, जि.प. गोंदिया), डॉ. निम्रोद पटले (अध्यक्ष, युवक काँग्रेस), सुखराम इडपाते (माजी सरपंच), गुणवंतराव बेलपांडे (माजी कॅशियर), नगीना धुर्वे व माधुरी इडपाते (ग्रामपंचायत सदस्य), भोजराम कोकुडे (माजी सरपंच लोणारा), बळीराम धुर्वे (माजी तंटामुक्ती अध्यक्ष), मुन्ना सलामे (बिरसा फायटर्स), हरडे शिक्षक (नवेझरी), दिनेश कोडपे (माजी तंटामुक्ती अध्यक्ष), वामनराव बांते (माजी पोलीस पाटील) तसेच इतर मान्यवरांचा समावेश होता.
कार्यक्रमात पंच कमिटी (१ ते ७) ची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे १ ते ७ क्रमांक देऊन नंदीधारक बालगोपालांना पारितोषिके देण्यात आली. बालकांच्या कल्पकतेने सजविलेल्या नंदी व त्यांच्या मिरवणुकीमुळे सोनेखारी गावाच्या सांस्कृतिक वारशाला नवे स्वरूप प्राप्त झाले.
मान्यवरांनी बालगोपालांचे कौतुक करताना असे नमूद केले की – “गावातील पुढच्या पिढीकडे परंपरा सोपविणे ही खरी संस्कृतीची जपणूक आहे. नंदीधारक बालगोपालांच्या कष्टातून व सृजनशीलतेतून ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडते.”
ग्रामस्थांच्या सहकार्याने व लोकसहभागामुळे हा उत्सव संस्मरणीय ठरला



