Home Latest News नागपूर ग्रामीण जिल्ह्यात महालोकअदालत : १३८० प्रकरणे निकाली, ११.३७ लाखांचा दंड वसूल

नागपूर ग्रामीण जिल्ह्यात महालोकअदालत : १३८० प्रकरणे निकाली, ११.३७ लाखांचा दंड वसूल

0
149

नागपूर :- नागपूर ग्रामीण जिल्हा न्यायालयाच्या अंतर्गत १३ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित महालोकअदालतीत एकूण १३८० प्रकरणे निकाली काढून ११,३७,७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नागपूर उपविभागातील ३४० प्रकरणांतून १,४५,००० रुपये, काटोलच्या ११५ प्रकरणांतून ३१,५०० रुपये, उमरेडमधील २४१ प्रकरणांतून तब्बल ४,६१,०५० रुपये, रामटेकच्या २०४ प्रकरणांतून १,५०,४०० रुपये, कन्हानच्या ९९ प्रकरणांतून १,३२,३०० रुपये तर सावनेर उपविभागातील ३८१ प्रकरणांतून २,१७,५०० रुपयांचा दंड वसूल झाला. या प्रकरणांत कलम २८५ भा.दं.वि. अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण करणे किंवा धोकादायक रित्या वाहन उभे करण्याची ७२२ प्रकरणे, मद्यपान करून वाहन चालविण्याची १८५ प्रकरणे, जुगाराची ९३ प्रकरणे आणि इतर ३८० प्रकरणांचा समावेश होता. या महालोकअदालतीत मोठ्या प्रमाणात प्रलंबित प्रकरणे मार्गी लागून नागरिकांना जलद न्याय मिळाला तसेच कायद्याचे पालन करण्याचा संदेश बळकट झाला.