spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मातंग समाजाच्या आरक्षणासाठी मुंबई ते नागपूर पायी महापदयात्रा नागपूरात

– मातंग समाजाच्या मुंबई ते नागपूर पदयात्रेचे नागपूरात महामोर्च्यात रूपांतर 

– मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण न दिल्यास राज्यभर तीव्र आंदोलन – विष्णु कसबे

नागपूर :- मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे,अनुसूचित जाती उपवर्गीकरण (अ-ब-क-ड) लागू करणे तसेच मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई ते नागपूर पायी पदयात्रा लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांच्या नेतृत्त्वात सुरू असून आज त्याचे नागपूर शहरात महामोर्च्यात रूपांतर झाले .समूर्ण महाराष्ट्रभर ठिकठिकाणी या पदयात्राचे स्वागत मातंग समाज करीत या पदयत्रेत सहभागी झाले होते .आज नागपूर मध्ये दाखल होऊन यशवंत स्टेडियम ते विधानभवन असा हजारो लोकांचा महामोर्चा काढण्यात आला. समाजाने अतिशय उत्स्फूर्त असे स्वागत करून या पदयात्रेला पाठिंबा देत लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. गेल्या कित्येक वर्षांपासून मातंग समाज हा दुर्लक्षित राहिला आहे. सामाजिक ,आर्थिक , शैक्षणिक , राजकीय दृष्ट्याही हा समाज काय दुर्लक्षित केला जातो आज या समाजाचा एकही आय ए एस अधिकारी नाही राजकीय दृष्ट्याही या समाजाला संधी मिळू दिली जात नाही असा हा समाज मुख्य प्रवाहात आणायचा असेल तर आरक्षणाची वर्गवारी झाली पाहिजे आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे .आणि तो फक्त स्वतंत्र्य आरक्षणाने मिळू शकतो आणि त्यासाठीच आज आम्ही मुंबई ते नागपूर पायी पदयात्रा काढून शासनाचे लक्ष वेधत आहोत.ही पदयात्रा सुमारे 14 जिल्ह्यातून गावागावातून आणि शहरातून आली आहे.

आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लहुजी शक्ति सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांनी या वेळी दिला आहे. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती घटकांमध्ये उपवर्गीकरण (अ-ब-क-ड) न झाल्यामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर अन्याय, भेदभाव व असंतोष निर्माण झाला आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार भारत देशातील अनेक राज्यांमध्ये अनुसूचित जाती आरक्षणाची वर्गीकरण करून समाजाला न्याय देण्याचे काम केले परंतु आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरण लागू करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला प्रदान केले आहेत. तरी सुद्धा आपण फक्त पटना उच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे तथापि, महाराष्ट्र राज्यात याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.

त्यामुळे, अनुसूचित जातीची आरक्षण अ ब क ड वर्गवारीची व इतर खालील प्रमाणे मातंग समाजाच्या पुढील न्याय्य मागण्या शासनाकडे सादर करणार आहोत.

१) सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ च्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करून अनुसूचित जातीतील १३% आरक्षणाचे अ-ब-क-ड उपवर्गीकरण लागू करावे.

न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल तात्काळ स्वीकारावा.

२) महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजावरील वाढत्या अन्याय-अत्याचाराला आळा बसण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात.

अनुसूचित जाती प्रतिबंध कायद्यान्वये दाखल गुन्हे जलदगती न्यायालयात चालवून आरोपींवर कठोर कारवाई करावी.

३) क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशींची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी.

४) साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांना “भारतरत्न” पुरस्कार जाहीर करण्यात यावा.

५) साहित्यरत्न डॉ. आण्णाभाऊ साठे विकास महामंडळासाठी १००० कोटी रुपयांचे भागभांडवल उपलब्ध करून महामंडळ तात्काळ सुरु करण्यात यावे.

६) मातंग समाजासाठी स्वतंत्र घरकुल योजनेचे उद्दिष्ट देऊन घरकुलाचे अनुदान रु. ५ लाख करण्यात यावे.

७) आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या नावाने “राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार” शासनाकडून जाहीर करण्यात यावा.

८) भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी असलेल्या पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी योजनेतील जाचक अटी रद्द करून अनुदान वाढवावे.जिरायती जमिनीकरिता २५ लाख व बागायती जमिनीकरिता ३५ लाख एकरी देण्यात यावे.

९) अनुसूचित जाती व नव बुद्ध घटकांचा विकास करणे याच्या अंतर्गत मातंग वस्तीमध्ये आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या नावाने तालीम उभारण्यासाठी विशेष तरतूद करण्यात यावी.

१०) आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्यात यावे

वरील सर्व मागण्या मातंग समाजाच्या न्याय, अस्तित्व, सामाजिक प्रगती आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी अत्यंत आवश्यक आहेत.

त्या अनुषंगाने आपण माननीय मुख्यमंत्री म्हणून तात्काळ सकारात्मक निर्णय घेऊन शासनस्तरीय आदेश जारी करावेत, अशा मागण्या महाराष्ट्र शासनाला करण्यात आल्या. या पदयात्रेचे व महामोर्च्याचे आयोजन लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य च्यावतीने करण्यात आले होते. मुंबई ते नागपूर महापदयात्रेचा महामोर्चात रूपांतर झाल.

महापदयात्रेचे प्रमुख नेतृत्व लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णु कसबे करीत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष कैलास दादा खंदारे, नितीन वायदंडे, नितीन दोडके, अनिल हातागळे अनिकेत हजारे, शंकर तायडे, किरण थोरात, रमीज सय्यद, आबा सरोदे, राहुल पाटोळे, अनिल कुमार कांबळे, हेमंत दाभाडे, श्रीनिवास मदिगा, आकाश बनसोडे, गणेश ताटे, तातेराव गोमतकर, शुभम खडसे आदि प्रमुख पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते राज्यभरातून सहभागी झाले होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.