किशोर साहू, मौदा :- संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीमहोत्सव सुरू असून,रविवार (ता.०२ ऑगस्ट) ला अण्णाभाऊ साठे चौक, कोदामेंढी येथे लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व महाप्रसादाच्या कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले व त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि परिवर्तनवादी कार्याचे स्मरण केले.
या कार्यक्रमाला भगवान बावनकुळे भाजपा तालुका मौदा मंडळ अध्यक्ष, गोपाल गिरमेकर उपसरपंच, ग्रा.पं. कोदामेंढी,नरेश बावनकुळे सामाजिक कार्यकर्ते , विष्णू बावनकुळे, कोमल खडसे ग्रामपंचायत सदस्य, पंकज खडसे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, पत्रकार शैलेश वाघमारे, नरेश बावणे, रवि बावणे, शुभम बावणे, हरीश बावणे, देवानंद मेश्राम, गोपाल हटवार, सुभाष बावनकुळे तसेच समाजातील बांधव व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





