नवी दिल्ली :- महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली येथे कार्यरत असणारे पाले हे ‘दफ्तरी’ या पदावरून आज शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार निवृत्त झाले. त्यांनी 40 वर्षे शासकीय सेवेत निष्ठापूर्वक सेवा दिली. परिचय केंद्रातर्फे त्यांचा सन्मान करुन सेवानिवृत्तीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी प्र.उपसंचालक मनिषा पिंगळे यांनी पाले यांच्या उत्कृष्ट सेवाभाव, कर्तव्यनिष्ठा आणि शिस्तबद्ध कार्यशैली चा गौरवपूर्ण उल्लेख करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास त्यांची पत्नी व मुलगी, कार्यालयातील सर्व कार्यरत अधिकारी व कर्मचारी तसेच सेवानिवृत्त झालेले जुने कर्मचारी देखील उपस्थित होते.








