spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाराष्ट्र ओबीसी कृती समिती तर्फे तीन दिवसीय दिल्ली दौरा संपन्न

– केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची डॉ. नामदेव राऊत व श्रावण फरकाडे यांनी घेतली भेट 

नागपूर :- महाराष्ट्र राज्यातील 27+6 ओबीसी समुदायाला केंद्रीय ओबीसी सूचीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी ओबीसीतील विविध समाज संघटनांतर्फे दिल्ली येथे केंद्रीय मंत्र्यांसह खासदार आणि इतर मान्यवरांकडे निवेदन सोपविले. महाराष्ट्र राज्यातील 27+6 ओबीसी समुदायाचा केंद्रीय ओबीसी सूचीमध्ये समावेश व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, इतर मागासवर्ग मंत्रालय, राष्ट्रीय पिछडा वर्ग आयोग यांच्या संयुक्त सुनावणी व संपूर्ण शासकीय प्रक्रिया पूर्ण करून, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग यांनी अंतिम अहवाल केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी 2 ऑक्टोबर 2024 ला प्रथम 15 जाती व पोटजातीचा अहवाल पाठविण्यात आला होता. त्यानंतर इतर 12 ओबीसी जात व पोटजातीचा अहवाल केंद्र शासनास पाठविल्याची माहिती आहे. 15 महिन्यांचा काळ लोटूनही वेळोवेळी पत्र, मेल्स, फोन्स, एसएमएस, प्रत्यक्ष भेटूनसुद्धा केंद्रीय मंत्री यांनी याबाबतचा अहवाल कॅबिनेटकडे पाठविला नाही. केंद्रीयमंत्री यांच्यानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची शिफारस आवश्यक असल्याचे कळले. त्यामुळे मागील बऱ्याच दिवसांपासून केंद्रीय गृह मंत्र्यांकडे संघटनेतर्फे पाठपुरावा सुरु होता. त्यानंतर ऑनलाईन मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे 16 ते 20 डिसेंबर 2025 असा दिल्ली दौरा ठरविण्यात आला. सर्व समाजाचे मंडळी दिल्ली येथे उपस्थित होऊन खालील मान्यवरांना त्यांच्या निवासस्थानी भेटून निवेदन सादर करून विनंती करण्यात आली. उच्च शिक्षणाकरिता या सर्व जाती समूहातील विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे, करिता अंतिम अहवाल त्वरित केंद्रीय कॅबिनेटमध्ये सादर करावा करिता विनंती करण्यात आली.

या मान्यवरांच्या भेट घेत निवेदन सोपविले

-अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार.

– नितीन गडकरी, केंद्रीयमंत्री, भारत सरकार.

-रक्षा खडसे, केंद्रीयमंत्री, भारत सरकार

– रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, भारत सरकार.

– हंसराज अहिर, अध्यक्ष, राष्ट्रीय पिछडा वर्ग आयोग,

– गेजराज सिंह, राष्ट्रपती यांचे ओएसडी,

– खासदार, साक्षी महाराज, उन्नाव, उत्तर प्रदेश,

– अमर काळे, खासदार, वर्धा, लोकसभा क्षेत्र,

– गणेश सिंग, खासदार व अध्यक्ष ओबीसी कमिटी, भारत सरकार.

– छत्रपती शाहू महाराज, खासदार, कोल्हापूर लोकसभा क्षेत्र,

– प्रतिभा धानोरकर, खासदार चंद्रपूर लोकसभा क्षेत्र,

– स्मिता वाघ, खासदार

-सुप्रिया सुळे, खासदार बारामती लोकसभा क्षेत्र,

– मुकुल वासनिक, खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय व अधिकारिता विभाग, भारत सरकार

– नितीन नवीन, कार्याध्यक्ष, भाजपा न्यू दिल्ली यांचे ओएसडी,

– निलेश काळभोर, निदेशक, सूचना भवन.

दौऱ्यामध्ये खालील समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पवार समाज : डॉ. नामदेव राऊत, श्रावण फरकाडे, मधुकर चोपडे, मोरेश्वर भादे.

बडगुजर समाज : प्राचार्य पी आर बडगुजर, एस एम बडगुजर, नरेंद्र बडगुजर, अनंत बडगुजर, हिरामण बडगुजर,

कराडी समाज : विलास पाटील, प्रल्हाद कासकर.

लोधी समाज : राम खरपुरिया, लालसिंग ठाकूर, अनंतलाल दमाहे, नेहाल कुमेरिया, मयूर मुरोडिया.

नेवे वाणी समाज : दीपक नेवे,

कोहळी समाज : नरेंद्र कापगाते.

परीट समाज : डी.डी.सोनटक्के.

गोवारी समाज : शालिक नेवारे.

डांगरी समाज : मुकुंद मुसळे.

Popular Articles