spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाराष्ट्र विषय संघ नागपूरच्या वतीने भव्य सामूहिक वधू वर परिचय मेळावा व उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन गुरुवारी

नागपूर :- दि. 18 जून रोजी ज्येष्ठांचा सत्कार समारंभ आणि शुक्रवारी 19 जून रोजी सामूहिक उपनयन व्रतबंध संस्कार सोहळा रॉयल माँ गंगा सेलिब्रेशनच्या भव्य सभागृहात संपन्न होणार आहे. 125 ज्येष्ठ ज्येष्ठांचा सत्कार करण्यात येईल. कारण समाजामध्ये व परिवार ज्येष्ठांकडे दुर्लक्ष करित आहे म्हणून महाराष्ट्र वैश्य संघ नागपूरच्या वतीने 125 ज्येष्ठांचा सत्कार करण्यात येईल.

कार्यक्रमा प्रसंगी समारंभाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक रमेशराव बहुगुणे हे राहतील. सुप्रसिद्ध मानस शास्त्रज्ञ डॉ. स्वाती धर्माधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन होईल. तसेच प्रमुख अतिथी म्हणून सुरेश मेखे, विलास घोडे, मनोज सराफ, विजय गोटीवाले आणि विशेष अतिथी म्हणून दिलीप दाभाडे, संदीप सराफ, निलेश घाटोळे, दिलीप शेटे यांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी सोहळ्यात स्वामी जितेंद्रनाथ महाराज अंजनगाव सुर्जी यांची उपस्थिती राहतील. समारंभाचे प्रमुख अतिथी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती राहतील तसेच विशेष अतिथी म्हणून खासदार माया इवनाते आमदार कृष्णा खोपडे, मोहन मते, प्रवीण दडके हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. अशी माहिती अध्यक्ष अनिल वलोकार आणि सचिव अजय वाऊ यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी उपस्थित मंचावरील विनोद बिंड, मंगेश वडाळकर, प्रदीप सपकाळ, सदानंद शेटे, दत्तात्रय ओलोकार, रमेश शेटे यांची उपस्थिती होती.

Popular Articles