Home Latest News आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना महावितरणचे अभिवादन

आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना महावितरणचे अभिवादन

0
61

 

नागपूर, 15 सप्टेंबर :- ‘कष्ट करा, फळ मिळवा’ या मंत्राचा उच्चार करत आपल्या अभियांत्रिकी प्रतिभेने देशाला विकासाच्या मार्गावर नेणारे महान कर्मयोगी, भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना त्यांच्या 165 व्या जयंतीनिमित्त महावितरणने त्यांना विनम्र अभिवादन केले.

महावितरणच्या काटोल मार्गावरील विद्युत भवन या मुख्यालयात आयोजित या कार्यक्रमात, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी, कार्यकारी अभियंता विजय तिवारी, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अतुल राऊत, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश जाधव, प्रणाली विश्लेषक प्रवीण काटोले, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर, वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन) सुशील विखार यांच्यासह संघटना प्रतिनिधी, अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी सर विश्वेश्वरय्या यांना अभिवादन केले.